नवी दिल्ली : सोन्याला अच्छे दिन येण्याची शक्यता दाट आहे. तर त्यापाठोपाठ चांदी पण वधारणार आहे. जागतिक पातळीवर घडामोडच तशी घडत आहे. अमेरिकेत रेकॉर्ड ब्रेक महागाईचा मोठा दबाव वाढला आहे. अमेरिकन केंद्रीय बँक, फेडरल रिझर्व्ह आक्रमक होऊ शकते. पूर्वीच्या अंदाजापेक्षा अधिक व्याजदर आकारण्याची भीती आहे. तर केंद्र सरकारने सोन्याच्या कोणतेही कलाकुसर नसलेल्या दागिन्यांच्या आयातीवर बंदी घातली आहे. केंद्राने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होत असल्याने हे पाऊल टाकण्यात आले आहे. त्याचा थेट परिणाम सराफा बाजारावर दिसून येईल. दागिन्यांच्या किंमतीत वाढ दिसेल. तर सोने आणि चांदी आता गगन भरारी घेण्याची शक्यता आहे. सोने-चांदीत (Gold Silver Price Today) इतकी वाढ झाली आहे.
हजार रुपयांची भरारी
जुलै महिन्यात खऱ्या अर्थाने सोने आगेकूच करत आहे. गेल्या दोन महिन्यात, मे आणि जून मध्ये किंमतीत मोठी तफावत दिसली नाही. भावात चढउतार होता. पण दर घसरणीवरच होते. जुलै महिन्यात सोन्याने मोठा पल्ला गाठला. एक हजार रुपयांची दरवाढ झाली. चांदी 1300 रुपयांनी वधारली. यामुळे गुंतवणूकदारांना उकळ्या फुटल्या आहेत. त्यांना अधिक फायदा मिळेल.
या महिन्यात भरारी
13 जुलै रोजीचे दर अपडेट झालेले नाही. 12 जुलै रोजी सोन्यात 210 रुपयांची वृद्धी झाली. 8 जुलै रोजी सोने थेट 400 रुपयांनी वधारले. 4 जुलै आणि 6 जुलै रोजी सोन्यात प्रत्येकी 100 रुपयांची दरवाढ झाली होती. 1 जुलै रोजी सोन्यात 220 रुपयांची उसळी घेतली होती. गुडरिटर्न्सनुसार, या महिन्यात 3, 7, आणि 10 जुलै रोजी सोन्यात प्रत्येकी 100 रुपयांची घसरण दिसून आली. काल 12 जुलै रोजी, 22 कॅरेट सोने 54,800 रुपये तर 24 कॅरेट सोने 59770 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले.
14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव
किंमती मिस्ड कॉलवर
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.
BIS Care APP
सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.