जर तुम्हाला मालमत्ता (Property) खरेदीमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तुमच्यासाठी एक चांगली संधी निर्माण झाली आहे. बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) तुम्हाला ही संधी उपलब्ध करून देत आहे. बँक ऑफ बडोदाकडून 19 एप्रिल रोजी गहान ठेवलेल्या संपत्तीचा लिलाव (Auction) करण्यात येणार आहे. या मालमत्तेमध्ये घरांसोबतच दुकाने आणि सहान जागांचा देखील समावेश आहे. या मालमत्तेचे खास वैशिष्ट म्हणजे ही मालमत्ता वेगवेगळ्या दरांमध्ये् आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही या लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन देशात कुठेही तुमच्या बजेटनुसार मालमत्ता खरेदी करू शकता. बँकेच्या वतीने या लीलाव प्रक्रियेत जास्तीजास्त जणांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. जे ग्राहक बँकेकडून कर्ज घेतात. मात्र पुढे काही कारणांमुळे कर्जाची परतफेड करणे शक्य होत नाही, अशा ग्राहकांची संपत्ती बँकेकडून जप्त केली जाते. पुढे या संपत्तीच्या विक्रीमधून बँकेचे पैसे वसूल केले जातात.
रिपोर्टनुसार बँक ऑफ बडोदाकडून 19 एप्रिल रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या या लिलावामध्ये अनेक जण सहभागी होण्याची शक्यता आहे. खरेदीदार या लिलावामध्ये सहभागी होऊन बोली लावत आपली मनपसंत संपत्ती खरेदी करू शकतात. लीलावामध्ये बोली जिंकून खरेदी केलेल्या संपत्तीचा कब्जा देखील तातडीने बँकेच्या वतीने संपत्ती खरेदी करणाऱ्या व्यक्तीला मिळणार आहे. एवढेच नाही तर संबंधित संपत्ती खरेदी करण्यासाठी तुम्हाला लोन हवे असल्यास ते देखील बँकेच्या वतीने तुम्हाला तात्काळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बोली लावण्यासाठी बँकेची अधिकृत वेबसाईट https://www.bankofbaroda.in/e-auction/e-auction-property-search या साईटला भेट देण्याचे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे.
बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर तुम्हाला या लिलावासंबधित सर्व माहिती मिळणार आहे. या लिलावामध्ये पाच लाख चाळीस हजारांपासून ते एक कोटी पन्नास लाख रुपयांच्या संपत्तीचा समावेश आहे. अनेक जण आपली संपत्ती गहान ठेवून किंवा तारण ठेवून बँकेकडून कर्ज घेतात. मात्र असे कर्ज परत न फेडल्यामुळे थकीबाकीदारांची संपत्ती बँकेकडून जप्त केली जाते. त्यानंतर ही संपत्ती विकून बँक आपले कर्ज वसूल करते.
तापमानाचा पारा चढला; AC ची मागणी वाढली, विक्रीत रेकॉर्ड ब्रेक वाढ
CNG – PNG Price : सीएनजी, पीएनजी आणखी महाग होण्याची शक्यता, सर्वसामान्यांना बसणार मोठा फटका
केंद्र सरकारचा मसुदा : गृहनिर्माण क्षेत्रात दूरसंचार पायाभूत सुविधा उभारणे अनिवार्य