SBI कडून ग्राहकांसाठी खुशखबर, कोणत्याही एटीएममधून कितीही वेळा पैसे काढा

| Updated on: Apr 16, 2020 | 5:10 PM

देशातील सर्वात मोठी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) सर्व एटीएम कार्ड ग्राहकांना 30 जून पर्यंतचे सर्व ट्रॅन्जेक्शन मोफत(SBI give free transaction for atm users) दिले आहेत.

SBI कडून ग्राहकांसाठी खुशखबर, कोणत्याही एटीएममधून कितीही वेळा पैसे काढा
Follow us on

मुंबई : देशातील सर्वात मोठी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) सर्व एटीएम कार्ड ग्राहकांना 30 जून पर्यंतचे सर्व ट्रॅन्जेक्शन मोफत(SBI give free transaction for atm users) दिले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या निर्णयामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आता एसबीआय ग्राहक कितीही वेळा आणि कोणत्याही बँकेच्या एटीएममधून ट्रॅन्जेक्शन करु शकतात. यासाठी एसबीआय ग्राहकांकडून एकही शुल्क आकारणार (SBI give free transaction for atm users) नाही.

यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सेव्हिंग अकाऊंटसाठी 8 मोफत ट्रॅन्जेक्शन दिले होते. ज्यामध्ये तीन ट्रॅन्जेक्शनचा उपयोग तुम्ही दुसऱ्या बँकेच्या एटीएमसाठी करु शकता. तर छोट्या शहरात स्टेट बँकेकडून 10 ट्रॅन्जेक्शन दिली होती.

बँकेकडून ग्राहकांना काही मर्यादीतच एटीएम ट्रॅन्जेक्शन दिले जाते. पण जेव्हा मर्यादीत दिले गेलेले ट्रॅन्जेक्शन संपते. त्यानंतर पुढील ट्रॅन्जेक्शनसाठी बँक ग्राहकांकडून शुल्क आकारते.

“बँकेच्या ग्राहकांनी कोणत्याही इतर बँकेच्या एटीएममधून कितीही वेळा पैसे काढले तर त्यावर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. पुढील 3 महिने म्हणजेच 30 जून पर्यंत एटीएएम ट्रॅन्जेक्शनवर मोफत दिले जाणार आहेत”, अशी घोषणा 24 मार्च रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली होती.

24 मार्ज रोजी अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणेच्या आधारे, भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया 30 जूनपर्यंत SBI एटीएम किंवा इतर कोणत्याही एटीएममधून कितीही वेळा ट्रॅन्जेक्शन केल्यास एकही रुपये शुल्क आकारणार नाही, असं ट्वीट एसबीआयने केले आहे.

आरबीआयच्या नियमानुसार, एटीएम ग्राहकांना प्रत्येक महिन्याला 5 ट्रॅन्जेक्शसाठी शुल्क द्यावे लागत नाही. पण यापेक्षा अधिक ट्रॅन्जेक्शनवर बँक ग्राहकांकडून पैसे वसुल करते. तसेच आरबीआयने स्पष्ट केलं की, नॉन-कॅश ट्रॅन्जेक्शन म्हणजेच बॅलेन्स चेक, फंड ट्रान्सफरवर बँक शुल्क आकारु शकत नाही.