भारतीय आयुर्विमा महामंडळ(LIC) ही देशातील सर्वात मोठी आणि जुनी विमा पॉलिसी कंपनी आहे. सरकारी मालकी असलेल्या या कंपनीचे देशभरात लाखो एजंटचे जाळे आहे तर कोट्यवधी ग्राहक (Customer) आहेत. एलआयसीचे विमा पॉलिसीचे अनेक टेबल्स आहेत. यामध्ये जीवन उमंग (Jeevan Umang Policy) ही एक अनोखी पॉलिसी खास ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. ऐन तारुण्यात जर ही पॉलिसी घेतली तर उतारवयात तुम्हाला चांगला परतावा मिळतोच पण तुम्ही दीर्घायुष्य जगेपर्यंत तुम्हाला विमा संरक्षण ही मिळते. या पॉलिसीत तब्बल 100 वर्षांचे विमा संरक्षण मिळते. हा एलआयसीचा एका खास एंडोमेंट प्लॅन आहे. रोज केवळ 45 रुपये गुंतवणुकीतून विमाधारकाला आयुष्याच्या संध्याकाळी चांगला परतावा या विमा पॉलिसीच्या माध्यमातून मिळतो. महिन्याला 1,350 रुपयांची गुंतवणूक करुन विम्यासोबत चांगला परतावा ही मिळतो.
या पॉलिसीद्वारे तुम्ही 100 वर्षांपर्यंत विमा संरक्षण मिळवू शकता. ही पॉलिसी 90 दिवसांपासून ते 55 वर्षे वयापर्यंत कोणताही भारतीय नागरीक खरेदी करू शकतो. पॉलिसी पूर्ण होण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, पॉलिसीमध्ये जमा रक्कम त्याच्या वारसाला मिळते. तसेच जर व्यक्ती हयात असेल तर पॉलिसीतील कालावधीनुसार त्याला रक्कम मिळते.
ही पॉलिसी खरेदी करणा-या पगारदार व्यक्तीला ही योजना कर सवलत मिळवून देते. जर तुमचे उत्पन्न टॅक्स स्लॅबमध्ये येत असेल, तर अशा परिस्थितीत तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची वजावट मिळते. या पॉलिसीमध्ये तुम्हाला 2 लाख रुपयांची विमा रक्कम मिळते. ग्राहकाला ही पॉलिसी 15 वर्षे, 20 वर्षे, 25 वर्षे आणि 30 वर्षांसाठी खरेदी करता येते.
LIC ची जीवन उमंग विमा पॉलिसी तुम्ही खरेदी केली असेल आणि 30 वर्षांसाठी 4.5 लाख रुपयांचे विमा संरक्षण घेतले तर तुम्हाला 1,350 रुपये महिन्याला जमा करावे लागतील.अशा परिस्थितीत या पॉलिसीत तुम्हाला दररोज फक्त 45 रुपये गुंतवावे लागतील.30 वर्षांनंतर, तुम्हाला वार्षिक 4,76,460 रुपये मिळतील. हा परतावा तुम्हाला 100 वर्षांसाठी दरवर्षी मिळेल. एकंदरीत या पॉलिसीतंर्गत तुम्हाला 36 लाख रुपयांचा परतावा मिळेल.
एलआयसीची सर्वाधिक विक्री होणा-या योजनेचे नाव आहे, जीवन लाभ पॉलिसी (Jeevan Labh Policy). या योजनेत ग्राहकांना दोन प्रकारचा फायदा देण्यात येतो. हा फायदा बोनस रुपात मिळतो. यामध्ये पहिला बोनस हा पहिला पुनरावृत्ती (Revisionary) बोनस दिल्या जातो. तर शेवटचा बोनस हा अतिरिक्त (Additional) बोनस असतो. ग्राहकांना वेळेनुसार, दोन्ही बोनसचे फायदे देण्यात येतात. या पॉलिसी अंतर्गत ग्राहकाला कसा फायदा देण्यात येतो, याविषयी जाणून घेतानाच या पॉलिसीचे वैशिष्टये ही समजून घेऊयात.या पॉलिसीचे वैशिष्ट्ये म्हणजे दरमहा 794 रुपयांचा प्रिमियम भरुन विमाधारकाला (Policyholder) कालावधी पूर्ण होण्याअगोदरच 5.25 लाख रुपये मिळू शकतात. यासोबतच या योजनेच्या कालावधी दरम्यान ग्राहकाला विमा संरक्षण कवच ही मिळते. ही पॉलिसी 8 वर्षाच्या मुलापासून ते अधिकत्तम 50 वर्षांच्या व्यक्तीला घेता येते. अजून एक वैशिष्ट्ये म्हणजे, या पॉलिसीवर ग्राहकाला कर्ज सुविधा ही मिळते.