Windfall Tax : आनंदाची गुढी! स्वस्त पेट्रोल-डिझेलसाठी मोदी सरकारचे एक पाऊल पुढे, कच्चा तेलावरील विंडफॉल करात कपात

| Updated on: Mar 21, 2023 | 5:42 PM

Windfall Tax : पेट्रोल-डिझेलच्या आघाडीवर केव्हा पण आनंदवार्ता येऊन धडकू शकते. कच्चा तेलावरील घरगुती उत्पादनावरील विंडफॉल करात मोठी कपात करण्यात आली आहे. काय होऊ शकतात परिणाम जाणून घ्या

Windfall Tax : आनंदाची गुढी! स्वस्त पेट्रोल-डिझेलसाठी मोदी सरकारचे एक पाऊल पुढे, कच्चा तेलावरील विंडफॉल करात कपात
लवकरच आनंदवार्ता
Follow us on

नवी दिल्ली : मोदी सरकारने (Modi Government) देशातील पेट्रोलियम कंपन्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने सोमवारी कच्चा तेलावरील (Crude Oil) घरगुती उत्पादनावरील विंडफॉल करात (Windfall Tax) 4400 रुपये प्रति टनात 900 रुपयांची कपात केली. आता हा भाव 3,500 रुपये प्रति टन झाला आहे. यामुळे पेट्रोल आणि एव्हिएशन फ्यु्अल (ATF) दोघांची निर्यात लेव्ही मुक्त करण्यात आली आहे. डीझलवरील निर्यात शुल्क (Diesel Export Duty) 0.50 रुपयांवरुन वाढवून 1 रुपये प्रति लिटर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. नवीन दर 21 मार्चपासूनच प्रभावीपणे लागू करण्यात आली आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्र सरकारने कच्चा तेलावरील विंडफॉल करात कपात केली आहे. यामुळे देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती घटण्याची दाट शक्यता आहे. केंद्र सरकारने घरगुती कच्चा तेलाच्या निर्यातीवरील करात कपात केली आहे. याचा अर्थ घरगुती बाजारात आता तेलाच्या पुरवठा अधिक सुरळीत होईल. त्यात सुधारणा होईल. यामुळे तेल विपणन कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात होईल, अशी आशा आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे घरगुती उत्पादनाला प्रोत्साहन मिळेल. विंडफॉल करातील कपात केवळ देशातील कच्चा तेल उत्पादनावर करण्यात आला आहे.

यापूर्वी केंद्र सरकारने 4 मार्च जी स्थानिक उत्पादीत कच्चा तेलावरील अप्रत्यक्ष करात वाढ केली. हा कर 4350 रुपये प्रति टनाहून 4400 रुपये प्रति टन करण्यात आला होता. आता हा कर कमी करण्यात आला आहे. डिझेल निर्यात शुल्कात कपात करण्यात आली आहे. 0.5 रुपये प्रति लिटर ही कर कपात करण्यात आली. यामुळे एटीएफवरील निर्यात शुल्क समाप्त करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

भारतात पहिल्यांदा 1 जुलै 2022 रोजी पेट्रोल आणि एटीएफवर 6 रुपये प्रति लिटर आणि डिझेलवर 13 रुपये प्रति लिटर असे निर्यात शुल्क आकारण्यात आले होते. त्यामाध्यमातून अप्रत्यक्ष कराचा लाभ मिळाला. घरगुती कच्चा तेलाच्या उत्पादनवर 23,250 रुपये प्रति टन अप्रत्याक्षित लाभावर कर लावण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या किंमतीं आधारे शुल्कात सुधारणा करण्यात येते.

केंद्र सरकारला 25,000 कोटी रुपयांची कमाई

केंद्र सरकारने यापूर्वी संसदेत याविषयीची माहिती दिली. विंडफॉल टॅक्सच्या माध्यमातून या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने जोरदार कमाई केली. केंद्र सरकारला 25,000 कोटी रुपयांची कमाई करता आली. स्पेशल एडिशनल एक्साईज ड्युटी (SAED) याच्या माध्यमातून हा फायदा झाला. केंद्र सरकारने कच्चे तेल, एअर टरबाईन फ्युअल, पेट्रोल-डिझेलवरील निर्यातीवरील विंडफॉल टॅक्सच्या माध्यमातून कमाई केली आहे. केंद्र सरकार या करातून मोठा फायदा झाला आहे.