नवी दिल्ली : कोरोना महामारीने लोकांना गुंतवणूक व त्याचबरोबर विम्याचे महत्त्व लक्षात आणून दिले आहे. त्यामुळे लोक गुंतवणुकीचा विचार करू लागले आहेत. यातही गुंतवणूक आणि विमा हे दुहेरी फायदे कसे मिळतील, याकडे लोक लक्ष देत आहेत. सध्या लोक गुंतवणूकीचे वेगवेगळे मार्ग शोधत आहेत. काहीजण म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताहेत, तर काही अन्य मार्गाने गुंतवणूक करीत आहेत. अशा परिस्थितीत यूलिपचा प्रामुख्याने उल्लेख केला जात आहे. यात आपला विमा काढला जातो, त्याचबरोबर गुंतवणूकीचे लाभदेखील मिळवतात. हा दुहेरी लाभ मिळवून देणारे युलिप म्हणजे नेमके काय, त्यात पैसे कसे गुंतविले जाऊ शकतात. हे आपण जाणून घ्यायला हवे. (Good returns from insurance and investment, know what is ULIP)
युलिप म्हणजे युनिट लिंक्ड विमा योजना. ही एक विशिष्ट प्रकारची पॉलिसी आहे. विमा कंपन्या आपल्याला विमा संरक्षण पुरवण्यासह गुंतवणूकीची संधी देतात. यामध्ये दोन फायदे आहेत. एक म्हणजे आपल्याला मुदतविमा मिळेल तसेच प्रीमियमचा काही भाग गुंतविला जाईल. गुंतवणुक केलेल्या रक्कमेतून म्युच्युअल फंडाप्रमाणेच परतावा मिळतो. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, आपण आपल्या विमा संरक्षणासाठी प्रीमियम द्या. विमा कंपनी लाइफ कव्हर व इतर खर्च कमी करून उरलेले पैसे गुंतवते.
तुम्ही मुदत विमा घेतल्यास तुम्हाला केवळ विम्याचा लाभ मिळेल. पॉलिसीधारकाचा पॉलिसीच्या मुदतीदरम्यान मृत्यू झाल्यास वारस म्हणून नाव नोंदवलेल्या व्यक्तीला विम्याची रक्कम मिळते. म्युच्युअल फंडाप्रमाणेच गुंतवणूकीसाठी प्रिमियम एकत्र जमा केला जातो. तुम्ही आपल्या गुंतवणुकीच्या गरजेनुसार आपल्या गुंतवणूकीची विभागणी करू शकता. तथापि, काही बाबतीत हा विमा म्युच्युअल फंडांपेक्षा वेगळा आहे.
युलिपमध्ये प्रत्येक श्रेणीत एण्ट्री केली जाऊ शकते. काही कंपन्यांच्या योजनांमध्ये केवळ सात वर्षे, तर काही कंपन्या एका वर्षाच्या वयातही एण्ट्री करून घेतात. तुम्ही आपल्या सोईने प्रिमियम गुंतवणूक करू शकता. पॉलिसी बाजारवर दिलेल्या पॉलिसीनुसार, तुम्ही जर दरमहा 5 हजार रुपये गुंतवणूक केली तर पुढील 20 वर्षांत तुम्हाला जवळपास 85 लाख रुपये मिळतील.
युलिप एक लाईफ कव्हर उत्पादन म्हणून काही खास नाही. कारण विमा रक्कम प्रीमियमच्या 10 ते 15 पट मर्यादित असते. एक कोटीच्या कव्हरच्या युलिप योजनेचे प्रीमियम 2-3 लाख असेल. एक कोटीचे विमा कवच असलेल्या टर्म प्लानचा प्रिमियम 7 ते 8 हजार रुपये असेल. गुंतवणूकीच्या बाबतीत युलिप योजना 5 वर्षांच्या लॉक-इन-पिरियडमध्ये मोडते. तुलनेत म्युच्युअल फंडामध्ये बाहेर पडण्यासाठी खूप लवचिकता आहे. (Good returns from insurance and investment, know what is ULIP)
महिलांमध्ये घर खरेदीचा कल वाढला, जाणून घ्या घर खरेदीवर मिळणारे फायदेhttps://t.co/x2IYa2W3aq#home |#buying |#womens |#lead |#benefits |#loan
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 6, 2021
इतर बातम्या
इन्कम टॅक्सच्या धाडीनंतर तापसीचे ट्वीट म्हणाली, आता मी स्वस्त राहिले नाहीये