गेल्या काही महिन्यांपासून कांद्याची वधारलेली किंमत हळूहळू जमिनीवर येत आहे. केंद्र सरकारने बासमती तांदळावरील आणि कांद्यावरील किमान निर्यात मूल्य हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर कांद्या उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. त्यांना आता थेट परदेशात कांदा विक्री करता येईल. तर दरवाढीची ग्राहकांना झळ बसू नये यासाठी मोदी सरकारने अगोदरच तजवीज केली आहे. त्यामुळे मुंबई, दिल्ली, चेन्नईसह प्रमुख शहरात कांद्याची किंमत घसरली आहे.
ग्राहकांना मिळाला दिलासा
ग्राहक मंत्रालयाने सबसिडीचा कांदा बाजारात उतरवला आहे. त्यामुळे प्रमुख शहरातील कांद्याच्या दरात किलोमागे 5 रुपयांची घसरण दिसली आहे. या यादीत राजधानी दिल्ली, मुंबई, चेन्नईसह देशातील इतर शहरांचा समावेश आहे. सरकार दिल्लीत 35 रुपये प्रति किलो दराने कांदा विक्री करत आहे. तर किरकोळ बाजारात कांद्याची किंमत 50-80 रुपयांदरम्यान आहे. प्रतवारीनुसार कांद्याच्या किंमती कमी-जास्त होतात.
सरकारमुळे स्वस्त झाला कांदा
ग्राहक मंत्रालयाने शनिवारी या उपक्रमाची माहिती दिली. त्यानुसार, सरकारने या 5 सप्टेंबरपासून सबसिडीवर कांद्याची निर्यात सुरू केली आहे. त्यामुळे प्रमुख शहरातील कांद्याच्या किंमतीत घसरण दिसली. या प्रयत्नामुळे किरकोळ बाजारातील किंमतीत घसरण आली. दिल्लीत कांदा 60 रुपयांहून 55 रुपए प्रति किलोवर आला. मुंबईत 61 रुपयांहून हा दर 56 रुपये प्रति किलो, चेन्नईत किरकोळ किंमत 65 रुपयांहून 58 रुपये प्रति किलोवर आला.
केंद्र सरकारने राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (NCCF) आणि राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (NAFED) यांनी त्यांचे स्टोअर आणि मोबाईल व्हॅनद्वारे कांद्याची किरकोळ विक्री सुरू केली आहे. त्याचा श्रीगणेशा मुंबईत करण्यात आला. आता चेन्नई, कोलकत्ता, पाटणा, रांची, भुवनेश्वर आणि गुवाहाटीसह देशातील प्रमुख शहरात अशी विक्री सुरू झाली आहे.
अजून स्वस्त होऊ शकतो कांदा
सरकारकडे या घडीला 4.7 लाख टन कांद्याचा बफर स्टॉक आहे. येत्या महिन्यात कांदा आणि त्याची किंमत नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. गेल्या महिन्यापर्यंत खरीपाचे क्षेत्र 2.9 लाख हेक्टर आहे. तर वर्षभरापूर्वी ते 1.94 लाख हेक्टर होते. तर शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडे 38 लाख कांद्याचा साठा शिल्लक असल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे कांदा स्वस्त होण्याची शक्यता आहे.