मुंबईः खाद्यतेलाच्या (Edible Oil) किंमती मधल्या काळात प्रचंड वाढल्याने जनसामान्यांना त्याचा फटका बसला होता. मात्र आता आगामी काळात खाद्यतेलाच्या किंमतीत (edible oil price) आणखी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. किरकोळ बाजारात खाद्यतेलाच्या किंमती कमी करण्याच्या सूचना सरकारकडून कंपन्यांना देण्यात आल्या आत. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाकडून खाद्यतेल कंपन्यांना एका आठवड्यात उत्पादनांच्या किंमती कमी करण्यास सांगण्यात आल्या आहेत. सरकारकडून (Government) खाद्यतेलाच्या किंमतीत आणखी 10 ते 15 टक्के कपात होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात कंपन्यांनी खाद्यतेलाच्या दरात प्रतिलिटर 10 ते 15 रुपयांची कपात केली होती.
या संदर्भात सरकारकडून आज या तेल क्षेत्राशी संबंधित कंपन्यांची बैठक घेण्याक आली. यावेळी खाद्यतेलाच्या दरात कपात करण्याच्या उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली. खाद्यतेलाची किंमत 12 रुपये प्रतिलिटरपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.
सध्याच्या परिस्थितीत खाद्यतेलाच्या किमती 15-20 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात. त्यामुळे कंपन्या 10 ते 12 रुपयांनी प्रतिलिटर किमती कमी करू शकतात असं सरकारकडून व्यक्त करण्यात आले आहे.आज झालेल्या बैठकीत अनेक खाद्यतेल कंपन्यांनीही दर कमी करण्यास सहमती दर्शवली असून येत्या काही दिवसांत खाद्यतेलाच्या दरात कपात करण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
आजच्या बैठकीत अन्न विभागाचे सचिव सुधांशू पांडे उपस्थित होते. जगभरात खाद्यतेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे देशांतर्गत बाजारातही दर कमालीचे वाढले होते. भारताकडून गरजेपेक्षा कमी खाद्यतेल आयात करतो, अशा स्थितीत परदेशातील बाजारातील वाढीचा थेट परिणाम किरकोळ किंमतीवर झाल्याचे दिसून आले आहे.
अलीकडच्या काळात, सरकारकडून खाद्य तेलाच्या शुल्कात कपात करण्यासारखी महत्वाचा निर्णय उचलला जाऊ शकतो. तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमतीही सुधारत असल्याचे सांगण्याता आले आहे. अशा परिस्थितीत देशातील किरकोळ विक्रीचे दरही खाली आले आहेत. मात्र, घाऊक किमतीत जेवढी घसरण झाली तेवढी किरकोळ दरात घट झाली नसल्याचे सरकार मान्य करत आहे.
सध्या खाद्यतेलाच्या घाऊक दरात नरमाई झाल्याचे दिसून येत आहे. परदेशात खाद्यतेलाच्या किंमतीत ऐतिहासिक घसरण झाल्याचे वृत्त पीटीआयकडून छापण्यात आले होते. या घसरणीदरम्यान कच्च्या पामतेल आणि पामोलिन तेलाच्या किंमती खाली आल्या आहेत. परदेशी बाजारातील घसरणीमुळे आणि सरकारने रिफायनिंग कंपन्यांना दरवर्षी 2 दशलक्ष टन सोयाबीन आणि 2 दशलक्ष टन सूर्यफूल तेल आयातीचा कोटा जारी केल्याने सोयाबीन तेलाच्या किंमतीतही घसरण झाली आहे. यामुळे देशांतर्गत तेल कंपन्यांचा खर्च कमी झाला आहे. सरकारने या कमतरतेचा फायदा किरकोळ ग्राहकांना देण्यास सांगितले आहे. गेल्या महिन्यातच अनेक कंपन्यांनी खाद्यतेलाच्या दरात कपात करण्यात आली होती. तथापि, गेल्या महिन्याच्या उत्तरार्धात पीटीआयच्या अहवालात, सूत्रांनी सांगितले की, विदेशी बाजारातील किंमती प्रति लिटर 40-50 रुपयांनी कमी झाल्या आहेत. आणि तरीही घाऊक किमतीत झालेल्या घसरणीचा पूर्ण फायदा कंपन्या ग्राहकांना देत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.