नवी दिल्ली | 19 March 2024 : शेअर बाजारात सध्या घसरणीचा काळ आहे. गेल्या काही दिवसांपासून स्टॉक मार्केटमध्ये पडझड सुरु आहे. बीएसई सेन्सेक्समध्ये 700 अंकांची घसरण दिसून आली. तर एनएसई निफ्टीमध्ये जवळपास 250 अंकांची घसरण दिसून आली. मंगळवारी निफ्टी 238.25 अंकांनी घसरुन 21,817.45 अंकावर बंद झाला होता. तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 736.37 अंकांनी घसरुन 72,012.05 अंकांनी बंद झाला. दिवसभरातील व्यापारी सत्रात निफ्टी 21,978.30 अंकांनी तर सेन्सेक्स 72,490.09 अंक इतका वधारला. शेअर बाजारात सारखे हिंदोळे का येत आहे, सारखी पडझड का होत आहे, याचे कोडे सर्वांनाच पडले आहे.
या कारणामुळे बाजारात घसरण
बँक निफ्टीत जोरदार घसरण
बँक निफ्टीत आज घसरण दिसून आली. त्याचा परिणाम सर्व बाजारावर दिसून येत आहे. बँक निफ्टीतील सर्व 12 शेअर आज एका मर्यादीत टप्प्यात ट्रेड करताना दिसले. सर्व मुख्य बंक शेअरमध्ये सुस्तीचे वातावरण दिसून आले. त्यामुळे बाजार थंडावलेला होता. बँक निफ्टीत सर्वाधिक विक्री झाली. अर्ध्यांहून अधिक घसरण झाल्याने बाजाराला मोठा फटका बसला.