देशात निवडणुकीचा हंगाम सुरु आहे. त्यातच आता सरकारसाठी आनंदवार्ता आली आहे. जनतेने निवडणुकीच्या रणधुमाळीत सरकारचा खजिना भरणार आहे. आकडेवारीनुसार, पहिल्यांदा सरकारला रेकॉडब्रेक कमाई करता आली. केंद्रीय अर्थमंत्रालयाने बुधवारी याविषयीची आकडेवारी समोर आणली. त्यानुसार गेल्या 7 वर्षांत पहिल्यांदा जीएसटी वसुलीचा आकडा 2.1 लाख कोटींच्या घरात गेला. जो गेल्यावर्षी एप्रिल महिन्यातील वसुलीपेक्षा 12.4 टक्के अधिक आहे. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात सरकारला 1.87 लाख कोटी रुपयांची जीएसटी वसुली झाली होती.
निव्वळ जीएसटी किती
महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा
चालू आर्थिक वर्षात 2024-25 च्या पहिल्या महिन्यात जीएसटी वसुली 2 लाख कोटींपेक्षा अधिक झाली आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यात 1.78 लाख कोटी जीएसटी वसुली झाली होती. त्यापेक्षा हा आकडा 17.81 टक्के अधिक आहे. सालाबादाप्रमाणए जीएसटीत महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे. एप्रिल महिन्यात जीएसटीचे 37,671 कोटी रुपये मिळाले आहेत. गेल्यावर्षीपेक्षा हा आकडा 13 टक्के अधिक आहे.
कशी झाली कमाई
एकूण जीएसटी वसुलीत यंदा केंद्रीय जीएसटी कलेक्शन 43,846 कोटी रुपये, तर राज्याकडून 53,538 कोटी रुपयांची वसुली झाली. एकीकृत जीएसटी 99,623 कोटी रुपये राहिला. यामध्ये 37,826 कोटी रुपये आयात केलेल्या वस्तूंवर मिळाले. याशिवाय जीएसटी सेसच्या रुपात 13,260 कोटी रुपयांची वसुली झाली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ट्विट करत जीएसटी वसुलीत पहिल्यांदाच 2 लाख कोटींचा टप्पा ओलांडल्याची माहिती देण्यात आली आहे.
राज्यांच्या झोळीत काय
एप्रिल महिन्यात केंद्र सरकारने एकीकृत जीएसटीमधून 50,307 कोटी रुपयांचे सेटलमेंट केले. तर राज्यांना 41,600 कोटी रुपये दिले. राज्यांची एकूण जीएसटी वसुली 95,138 कोटी रुपयांवर पोहचली आहे. तर केंद्राची एकूण 94,153 कोटी रुपये जीएसटी वसुली झाली आहे. जीएसटीच्या बिलावर नजर फिरवल्यास तुम्हाला त्यात राज्य आणि केंद्राचे दोन वाटे दिसतील.