GST Collection | वस्तू आणि सेवा करामुळे (Goods and Service Tax) केंद्र सरकारला (Central Government) मालामाल केले आहे. गेल्या पाच वर्षांतील जीएसटीचा प्रयोग सरकारला चांगलाच फायदेशीर ठरला आहे. तरीही अनेक क्षेत्र आणि अनेक उत्पादने जीएसटीच्या परीघाबाहेर (Out of GST Circumference) आहेत. ही सर्व क्षेत्रे जीएसटीत आल्यावर केंद्र सरकारच्या गंगाजळीत पैशांचा ओघ सुरुच राहिल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. सलग पाचव्या महिन्यात जीएसटी संकलन 1.4 लाख कोटींच्या पुढे गेले आहे. जुलै महिन्यात वस्तू आणि सेवा कराच्या मदतीने एकूण 1.49 लाख कोटी रुपये सरकारी तिजोरीत (Government Treasury)आले. जीएसटी संकलनातून यापूर्वी जूनमध्ये 1.44 लाख कोटी, मे महिन्यात 1.40 लाख कोटी, एप्रिलमध्ये 1.67 लाख कोटी आणि मार्चमध्ये 1.42 लाख कोटींची गंगाजळी जमा झाली होती. वार्षिक आधारावर, जुलैमध्ये जीएसटी संकलनात 28 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. जुलै 2021 मध्ये GST संकलन 1,16,393 कोटी होते. याशिवाय कोणत्याही एका महिन्यात करवसुलीचा हा दुसरा सर्वाधिक आकडा आहे.
जुलैमध्ये एकूण जीएसटी संकलनात केंद्रीय जीएसटीचे योगदान 25,751 कोटी रुपये होते. राज्यांकडून संकलित जीएसटीचे योगदान 32,807 कोटी रुपये होते आणि इंट्रा जीएसटीचे योगदान 79,518 कोटी रुपये होते. उपकराच्या मदतीने एकूण 10,920 कोटी रुपये सरकारी तिजोरीत आले.
₹1,48,995 crore gross GST revenue collected in the month of July 2022
GST Revenue collection for July second highest ever & 28% higher than the revenues in the same month last year
Read details: https://t.co/TdZTWLNVxT pic.twitter.com/bkfMGSwqao
— PIB India (@PIB_India) August 1, 2022
आता या करसंकलनाचे विश्लेषण केल्यावर लक्षात येते की, 79518 कोटींच्या IGST मध्ये आयातीच्या मदतीने 41420 कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत आले आहेत. एवढेच नाही तर 10,920 कोटींच्या उपकराचे 995 कोटी रुपये आयातीच्या मदतीने तिजोरीत जमा झाले आहेत. गेल्या पाच महिन्यांत जीएसटी संकलनाचा आकडा 1.4 लाख कोटींच्या पुढे गेला आहे. यात सर्वात महत्वाची बाब म्हणजे, सरकारच्या कर संकलनात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या महिन्यात सरकारने आयात कमी करण्यासाठी अनेक शुल्क लावले. त्याचा परिणाम दिसून आला आहे. सोन्याची आयात अजूनही कमी झाली नाही. पण सरकारच्या तिजोरीत गंगाजळी कर रुपातून येत आहे. तज्ज्ञांच्या मते, आर्थिक सुधारणांचाही परिणाम या कर संकलनातून स्पष्ट दिसून येत आहे.
अलीकडे, जीएसटी परिषदेने अशा अनेक उत्पादनांवर आणि सेवांवर वस्तू आणि सेवा कर (GST) लागू केला आहे. अनेक वस्तू आणि सेवा जीएसटीच्या कर कक्षात आणल्या. त्यावर आता जीएसटी आकारण्या येत आहे. त्याचा ही परिणाम कर संकलनात दिसून येतो. हॉटेलचे भाडे, खासगी रुग्णालयातील 5,000 रुपयांपेक्षा जास्त एसी रुम यावर जीएसटीचा आकार लागू असेल. एवढेच नाही तर त्यातही 12 ते 18 टक्क्यांची श्रेणी आहे. त्यानुसार ग्राहकांना जीएसटी द्यावा लागणार आहे. पॅक, सीलबंद खाद्यपदार्थांवरही 5 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे.