GST Council च्या बैठकीच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. ही बैठक येत्या 21 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे. राजस्थानमधील जैसलमेर येथे ही बैठक होईल. या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. या बैठकीनंतर देशात तंबाखू आणि सिगारेटच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. तर दैनंदिन जीवनातील अनेक वस्तू महागण्याची शक्यता आहे. तर आरोग्य आणि जीवन विम्यावरील जीएसटी सवलतीचा विचार होऊ शकतो. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परीषद होणार आहे.
सिगारेट आणि तंबाखूवर GST
21 डिसेंबर रोजीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये सिगारेट आणि तंबाखूवरील GST वाढवल्या जाऊ शकतो. सिगारेट आणि तंबाखूवर जीएसटी वाढवण्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी सुद्धा सरकारने सिगारेट आणि तंबाखूवर कर लावला आहे. जीएसटी दरांना तर्कसंगत करण्यासाठी मंत्र्यांच्या समूहाने बदल सुचवला आहे.
या उत्पादनावर सध्या 28% जीएसटी लावण्यात आला आहे. तो वाढवून आता 35% करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. महसूल वाढीसाठी हा प्रयत्न करण्यात येणार आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या समूहाने सोमवारी हा दर निश्चित करण्यासाठी बैठक घेतली. या समूहाने तंबाखूवर 35% दर प्रस्तावित करण्यावर सहमती व्यक्त केली आहे. त्यासाठी 5%, 12%, 18% आणि 28% या चार स्तरावर ही विभागणी असेल. यामध्ये नवीन दर 35 टक्क्यांचा दर पण प्रस्तावित आहे.
विमा क्षेत्रावरील जीएसटीवरून सध्या केंद्र सरकारवर मोठा दबाव आहे. या बैठकीत विमा क्षेत्रातील काही उत्पादनावर मोठी सवलत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू शकतो. विमा स्वस्त होऊ शकतो. आरोग्य विमा स्वस्त झाल्यास मध्यम वर्गीयांचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.
या वस्तूवर GST होऊ शकतो कमी
पॅकेज्ड पाणी (20 लिटर आणि जास्त) : GST 18% टक्क्यांहून 5% कमी करण्याचा प्रस्ताव
10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या सायकलीवर GST 12% टक्क्यांहून 5% आणण्याचा प्रस्ताव
तर शालेय नोटबुकवर GST 12% टक्क्यांहून 5% करण्याचा प्रस्ताव
15,000 रुपये प्रति जोडी बुटावरील 18 टक्के जीएसटी हटवून तो 28% करण्यात आला
25,000 रुपयांपेक्षा महागड्या मनगटी घड्याळांवर जीएसटी वाढ, GST 18% टक्क्यांहून 28%