टीव्ही मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मधील रोशन सिंह सोढी अर्थात अभिनेता गुरुचरण सिंह याचा अजूनही थांगपत्ता लागलेला नाही. अनेक दिवसांपासून तो बेपत्ता आहे. त्याच्याविषयी अचूक अशी माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी काही शक्यता वर्तविल्या आहेत. त्याला शोधण्यासाठी काही पथक स्थापन करण्यात आली आहे. ते तपास करत आहेत. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच्यावर पाळत असल्याच्या भीतीने तो 27 विविध ई-मेल खात्याचा वापर करत असल्याचे समोर आले आहे.
अभिनेत्याला पाळत असल्याची भीती
आपल्यावर कुणीतरी पाळत ठेवत आहे, कोणीतरी लक्ष ठेवत आहे, या भीतीने त्याचा ई-मेल सतत बदल होता. वेगेवगळ्या ई-मेलच्या आधारे तो काम करत होता. हा 51 वर्षीय अभिनेता 22 अप्रिल रोजी मुंबईसाठी रवाना होणार होता. पण तो दिल्लीतून गायब झाला. पालममध्ये राहणारे त्याचे आई-वडील त्यामुळे हैराण झाले. त्याचा मोबाईल पण बंद येत असल्याने त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.
पोलिसांचे तपास मोहिम
प्रकरणात 26 एप्रिल रोजी पालम पोलिस ठाण्यात आयपीसी कलम 365 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. देशाबाहेर गोपनियरित्या एखाद्याला नेणे अथवा नजरकैदेत ठेवणे, अपहरण याप्रकरणात हे कलम लावण्यात येते. पोलीस पथकाने त्याच्या मोबाईल लोकेशनवरुन त्याचा तपास करण्याचे काम सुरु केले आहे. त्याच्याकडे दोन मोबाईल होते. पण दिल्लीतील घरात एक मोबाईल ठेवून तो मुंबईसाठी रवाना होत होता. पोलिसांच्या मते, त्याने शेवटचा कॉल त्याच्या मित्रांना केला होता. जो, त्याला मुंबई विमानतळावर घ्यायला येणार होता.
इतक्या संपत्तीचा मालक
पोलिस पथकाने त्याची बँक खाते, क्रेडिट कार्ड यावरुन त्याच्या व्यवहाराची माहिती, तपशील काढला आहे. त्याने सर्वात शेवटचा व्यवहार मुंबईला निघताना दिल्लीत केल्याचे समोर आलेले आहे. त्यानुसार एका एटीएममधून त्याने 14,000 रुपये काढले होते. त्याच्याकडे एकूण 10 वेगवेगळ्या बँकेची खाती होती. त्यात किती रक्कम आहे, याचा तपशील अद्याप उपलब्ध झालेला नाही. मीडियातील वृत्तानुसार, त्याच्याकडे एक कोटींच्या जवळपास संपत्ती आहे. टीव्ही शो व्यतिरिक्त जाहिरातीतून तो कमाई करत होता.