लोकसभा निवडणूक 2024 ची संपूर्ण देशात धामधूम सुरु आहे. बाजारात तेजी-मंदीचे वारे वाहत आहे. बाजारात पडझडीचे सत्र सुरु आहे. या पण घडामोडीत एक सरकारी शेअर जोरदार घौडदौड करत आहे. या कंपनीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पण कौतुक केले होते. या शेअरने गुंतवणूकदारांना आतापर्यंत मालामाल केले आहे. संरक्षण क्षेत्रातील या हिंदुस्थान एयरॉनॉटिक्स लिमिटेडच्या (HAL Share) शेअरने गुंतवणूकदारांचा पैसा डबल केला आहे. मग या शेअरमध्ये आता गुंतवणूक केल्यास फायदा होईल का?
आतापर्यंत 140 टक्क्यांचा परतावा
गेल्या ऑगस्टपासून ते आतापर्यंत या कंपनीने गुंतवणूकदारांना जवळपास 140 टक्क्यांचा परतावा दिला आहे. 10 ऑगस्ट 2023 रोजी एचएएलचा शेअर 1895 रुपये होता. तो आता 4539 रुपयांवर पोहचला आहे. सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. जर देशात स्थिर सरकार आले तर या शेअरमध्ये अजून तेजी दिसू शकते.
काय म्हणाले होते पीएम मोदी
10 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत जवळपास 2 तास 13 मिनिटांचे भाषण केले होते. या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर वाग्बाण सोडले होते. एलआयसी, एचएएल यासारख्या कंपन्या तोट्यात असून सरकार त्या खासगी कंपन्यांना विक्री करणार असल्याचा आरोप लावण्यात आला होता. त्यावर पंतप्रधानांनी गुंतवणूकदारांना या कंपन्यांवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. त्यानुसार या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा मिळून दिला.
जोरदार मिळाला फायदा
हिंदुस्थान एयरोनॉटिक्सने गुरुवारी तिमाही निकाल जाहीर केले. यामध्ये कंपनीने नवीन विक्रम केल्याचे समोर आले. कंपनीने आर्थिक वर्ष 2023-24 मधील चौथ्या तिमाहीत 4,308 कोटींचा नफा झाल्याचे स्पष्ट केले. यापूर्वीच्या तुलनेत हा नफा 52 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. या जोरदार निकालामुळे कंपनीचा शेअर सूसाट धावत आहे. गुरुवारी तर हा शेअर त्याच्या 52 आठवड्यातील उच्चांकावर पोहचला.
तज्ज्ञांचे मत काय
तज्ज्ञांच्या मते एचएएलचा शेअर अजून तेजीत असेल. मार्केट एक्सपर्ट्सनुसार येत्या काही दिवसात एचएएलचा शेअर अजून मोठी झेप घेईल. बाजारातील तज्ज्ञ सुमीत बगाडिया यांच्यानुसार, सरकारी कंपनीचा हा शेअर 4800 चा आकडा पार करेल. जवळपास 3 लाख कोटींचे मार्केट कॅप असणाऱ्या या कंपनीचे फंडामेंटल मजबूत आहे. कंपनी जवळपास कर्जमुक्त झाली आहे. या कंपनीने गुंतवणूकदारांना 25.8 टक्क्यांचा लाभांश पण दिला आहे.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका