आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा आज जन्मदिवस आहे. मुकेश अंबानी आता 66 वर्षांचे झाले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, इथपर्यंतचा त्यांचा प्रवास काही सोपा नव्हता. वडील धीरुभाई अंबानी यांच्याकडून वारसा हक्काने मिळालेली रिलायन्स इंडस्ट्रीज आज त्यांनी पूर्णपणे बदलून टाकली आहे. आता तीचा पसारा विस्तारला आहे. ही भविष्यातील कंपनी ठरली आहे. जाणून घेऊयात अंबानी यांची ही यशोगाथा…
तरुणपणीच रिलायन्सचा भाग
मुकेश अंबानी यांनी त्यांच्या 18 व्या वर्षीच रिलायन्सचे कामकाज पाहण्यास सुरुवात केली होती. 1981 पासून ते रिलायन्समध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज हे नावच या समूहाने 1985 मध्ये स्वीकारले होते. भविष्यातील रणनीती ठरविण्यात मुकेश अंबानी यांचा हातखंड असल्याचे म्हटले जाते.
रिलायन्सच्या कामाचे स्वरुपच बदलवले
टेलिकॉमचे स्वप्न गेले भावाकडे
आज रिलायन्सन घेतली भरारी
मुकेश अंबानी आज आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचा चेहरामोहरा बदलण्यासाठी त्यांनी आयुष्यातील 20 वर्षे खर्ची घातली. रिलायन्स आता केवळ पेट्रोकेमिकल पूरतीच मर्यादीत राहिली नाही तर टेलिकॉम आणि रिटेल क्षेत्रात तिने मोठी झेप घेतली आहे. भविष्यात ऊर्जा क्षेत्रात पण कंपनी मोठी भरारी घेण्याच्या तयारीत आहे. ग्रीन एनर्जी, अक्षय ऊर्जा क्षेत्रात पण कंपनीने मोठी योजना आखली आहे.