नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांना पण क्रिप्टोची भुरळ पडली, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर जोर धरत आहे. या व्हायरल मॅसेजमुळे एकच खळबळ उडाली आहे. अनेक गुंतवणूकदारांना धक्का बसला. टाटा समूह हा त्याच्या उच्च मुल्य आणि देश प्रेमासाठी ओळखल्या जातो. टाटा समूह अनेक सामाजिक कार्यात आघाडीवर आहे. रतन टाटा यांचा फॅन फॉलोवर पण अधिक आहे. त्यांचा मृदू स्वभाव, साधी राहणी यावर तरुणाई फिदा आहे. त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरील घडामोडींवर तरुणाई लक्ष ठेऊन असते. पण क्रिप्टो करन्सीची (Crypto Currency) घडामोड कशी माहिती नाही पडली असा सर्वांचा सूर होता. या सर्व गदारोळात दस्तुरखुद्द रतन टाटा यांनीच स्पष्टीकरण दिले.
असा केला खुलासा
टाटा समूहाचे पूर्व चेअरमन रतन टाटा हे क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करण्याची अफवा पसरली. या वार्तांचे टाटा यांनी खंडन केले. क्रिप्टो करन्सीशी आपला कसलाच संबंध नसल्याची भूमिका त्यांनी मांडली.
सोशल मीडियावरुन माहिती
त्यांच्या अधिकृत ट्विटर आणि इन्स्टाग्राम खात्यावर त्यांनी एक पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी ही अफवा असून क्रिप्टो करन्सीशी काहीच संबंध नसल्याचा खुलासा केला. क्रिप्टो करन्सीशी काहीच संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशाप्रकारची माहिती कोणी पसरवत असेल तर ती माहिती पूर्णता चुकीची असल्याचे म्हणणे त्यांनी मांडले. तसेच गुंतवणूकदारांना फसवण्यासाठी, दिशाभूल करण्यासाठी ही माहिती पसरविल्याचे सांगितले.
I request netizens to please stay aware. I have no associations with cryptocurrency of any form. pic.twitter.com/LpVIHVrOjy
— Ratan N. Tata (@RNTata2000) June 27, 2023
टाटा ट्रस्टचे मोठे योगदान
रतन टाटा यांचे नाव तर जगभरात त्यांच्या सामाजिक कार्य आणि देशप्रेमासाठी ओळखले जाते. आपल्या संपत्तीतील मोठ हिस्सा त्यांनी सामाजिक कार्यासाठी दान केला आहे. 1919 मध्ये टाटा ट्रस्टची (Tata Trust) स्थापना करण्यात आली. त्यावेळी 80 लाख रुपये दान करण्यात आले. टाटा ट्रस्ट ही भारतातील सर्वात जुनी सामाजिक संस्था आहे. या संस्थेमार्फत अनेक मोठ्या कामांसाठी सढळ हाताने दान देण्यात येते.
आनंद महिंद्रा यांच्याबाबत ही अफवा
यापूर्वी देशातील प्रसिद्ध उद्योगक आणि सोशल मीडियावर तरुणाईचे ताईत असलेले आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांच्यांविषयी अशीच अफवा आली होती. त्यावर त्यांनी स्पष्ट मत मांडले होते. क्रिप्टोमध्ये एक छदाम पण गुंतवणूक केली नसल्याचे म्हणणे त्यांनी मांडले होते.
ट्विट करत दिली माहिती
19 नोव्हेंबर 2021 रोजी ट्विट करत त्यांनी ही माहिती दिली होती. त्यांनी सुद्धा त्यांच्या नावाचा वापर करुन तयार केलेला मॅसेज ऑनलाईन पाहिला होता. त्यानंतर त्यांनी ट्विटरवर अशा लोकांची पोलखोल केली. हा मॅसेज पूर्णपणे चुकीचा असून तो दिशाभूल करण्यासाठी व्हायरल केल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.