यंदा कोणत्या बॅंकेच्या सीईओला मिळाले सर्वात जादा वेतन, दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे पाहा

| Updated on: Aug 07, 2023 | 8:43 PM

कोरोनाकाळातील मंदी आणि इतर अडचणी असून सरकारी आणि खाजगी बॅंकातील कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढच झाली आहे.

यंदा कोणत्या बॅंकेच्या सीईओला मिळाले सर्वात जादा वेतन, दुसऱ्या क्रमांकावर कोण आहे पाहा
bank ceo
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई | 6 ऑगस्ट 2023 : देशातील बड्या बॅंकातील अधिकाऱ्यांचे वेतनावरुन नेहमीच चर्चा आणि वादविवाद होत असतात. परंतू देशातील सार्वजनिक क्षेत्रातील आणि खाजगी क्षेत्रातील बॅंकामध्ये त्यांच्या सीईओना किती पगार असतो याचीही चर्चा सतत होत असते. भागभांडवल जादा असणाऱ्या या बॅंकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे पगाराचे आकडे डोळे दिपविणारे असतात. तर पाहूया देशातील दिग्गज बॅंकाच्या अधिकाऱ्यांचे वेतन किती आहे ते पाहूयात..

मार्केट कॅपिटलवरुन देशातील सर्वात मोठा व्यवसाय असणाऱ्या खाजगी क्षेत्रातील सगळ्यात मोठ्या एचडीएफसी बॅंकेच्या सीईओ शशीधर जगदीशन यांना आर्थिक वर्षे 2023 मध्ये 10.55 कोटी रुपये अदा करण्यात आले आहे. तसेच त्यांचे सहकारी बॅंकेचे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर कैझाद भरुचा यांना 10 कोटी वेतन मिळाले असल्याने ते देशातील दुसऱ्या क्रमांकाचे वेतन घेणारे बॅंक अधिकारी ठरले असल्याचे वार्षिक अहवालात म्हटले आहे.

देशातील तिसऱ्या क्रमांकाचे वेतन एक्सीस बॅंकेचे सीईओ अमिताभ चौधरी यांना 9.75 कोटी रुपये मिळाले आहे. या बॅंकेची कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या आयसीआयसीआय बॅंकचे संदीप बक्क्षी यांना त्यांच्या खालोखाल 9.60 कोटी रुपये वार्षिक वेतन अदा केले आहे. तिसऱ्या क्रमांकाची बॅंक कोटक महिंद्र हीचे 26 टक्के शेअर नावावर असलेल्या उदय कोटक यांनी कोरोना काळानंतर आता साल 2023 मध्ये टोकन म्हणून एक रुपयांचे रुपयाचं वेतन घेतले आहे.

ज्यावेळी कोटक महिंद्र बॅंक व्यवसाय कमी झाल्याने अडचणीत आली होती तेव्हाही या बॅंकेने कर्मचाऱ्यांनी दिलासा देण्यासाठी 16.97 टक्के पगार वाढ केली होती. आयसीआयसीआय बॅंकेने 11 टक्के पगार वाढ केली होती. एचडीएफसीने सरासरी 2.51 टक्के वाढ दिली तर फेडरल बॅंकेने 2.67 पगार वाढ दिली होती.

सर्वाधिक वेतन घेणाऱ्या जगदीशन यांचा पगार असा

एचडीएफसी बॅंकेचे सीईओ शशीधर जगदीशन यांना मिळालेल्या पॅकेजमध्ये बेसिक सॅलरी 2.82 कोटी रुपये, अलाऊन्स आणि इतर भत्ते 3.31 कोटी रुपये, प्रोव्हीडंट फंड 33.92 लाख आणि परफॉर्मन्स बोनस 3.63 कोटी रुपये असल्याचे अहवालात म्हटले आहे.