अमेरिकेतील शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्ग रिसर्चने गेल्यावर्षी अदानी यांच्यावर आरोप करुन खळबळ उडवून दिली होती. आता या फर्मने सेबीच्या अध्यक्ष माधवी बुच यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. हिंडेनबर्ग रिसर्चने शनिवारी रात्री आपल्या नव्या अहवालात शेअर बाजार नियामक संस्था सेबीच्या अध्यक्षांवरच हल्ला केला आहे. अदानी ग्रुपने केलेल्या कथित हेराफेरीवेळी वापरलेल्या परदेशी कंपनीत सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांची हिस्सेदारी असल्याचा नवा आरोप हिंडेनबर्ग रिसर्च ग्रुपने केला आहे. या आरोपांना सेबीच्या प्रमुख माधवी यांनी निराधार म्हटले आहे. तर दुसरीकडे अदानी ग्रुपने देखील स्पष्ट केले आहे की त्यांच्या कंपनीचा सेबी प्रमुखाशी कोणतेही व्यवहार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
अदानी ग्रुपने हिंडेनबर्गच्या आरोपावर उत्तर देताना या अहवालात ज्या लोकांचा आणि केसचा उल्लेख केला आहे. त्याच्याशी अदानी ग्रुपचे कोणतेही आर्थिक व्यवहार नाहीत असे अदानी ग्रुपने म्हटले आहे. अदानी ग्रुपने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच अदानी ग्रुपचे परदेशी होल्डींग स्ट्रक्चर संपूर्णपणे पारदर्शी आहे. हिंडेनबर्गने आपल्या रिपोर्टमध्ये अदानी ग्रुप संदर्भात सांगितले की त्यांनी कंपन्याचे जाळे विणत निधी ट्रान्सफर केला आहे.
हिंडेबर्गचे सर्व आरोप सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बुच आणि त्यांचे पती दोघांनी फेटाळून लावले आहे. त्यांनी म्हटलेय की रिपोर्टमध्ये लावलेले आरोप निराधार आणि गैरलागू आहेत. यात जराही सत्यता नाही.आमचे जीवन आणि आर्थिक स्थिती उघड्या पुस्तकासारखी असल्याचे पती आणि पत्नी म्हणाले आहेत. सर्व आवश्यक माहिती सेबीला पहिल्या वर्षीच दिलेली आहे.आम्हाला कोणत्याही आर्थिक दस्ताऐवजांना उघड करण्यास काहीही हरकत नाही. बुच यांनी म्हटले आहे की ज्या हिंडेनबर्ग रिसर्चवर सेबीने कारवाई आणि कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. त्याला उत्तर देताना आमच्यावर चिखलफेक केलेली आहे. संपूर्ण पाददर्शकेला ध्यानात ठेवून यासंदर्भातील आमचे म्हणणे लवकरच जारी करू असे सेबीने म्हटले आहे.
हिंडेनबर्गने अदानी यांच्यावर आपल्या पहिल्या अहवालाच्या अठरा महिन्यानंतर ब्लॉगपोस्टमध्ये आरोप केले आहेत. सेबीने मॉरिशस आणि विदेशी मुखवट्याच्या कंपन्यांच्या कथित अघोषीत जाळ्याचा तपास करण्यात सेबीने कोणतीही रुची दाखविलेली नाही. गुंतवणूक कंपनीने व्हिसलब्लोअर दस्ताऐवजाचा हवाला देऊन म्हटले की सेबीच्या सध्याच्या प्रमुख बुच आणि त्यांचे पतीकडे अदानी ग्रुपमध्ये पैशांची हेराफेरीत वापरलेले दोन्ही अस्पष्ट ऑफशोर फंडमध्ये भागीदारी होती. गौतम अदानी यांचे मोठे बंधू विनोद अदानी अस्पष्ट विदेशी फंड बर्मुडा आणि मॉरिशस फंडांना नियंत्रित करायचे. या कंपन्यांच्या फंडाचा वापर पैशाची हेराफेरी करणे आणि अदानी ग्रुपच्या शेअर्सची किंमत वाढविण्यासाठी केला गेला होता.
हिंडेनबर्गने आपल्या ताजा रिपोर्टमध्ये म्हटले आहे की आयआयएफएलमध्ये एका प्रमुखाच्या हस्ताक्षर वाल्या फंडाची घोषणे म्हटले होते की गुंतवणूकूीचा स्रोत वेतन आहे.आणि बुच दाम्पत्याची एकूण संपत्ती एक करोड़ अमेरिकी डॉलर आहे. गई है.हजारो सुस्थापित भारतीय म्युच्युअल फंड असूनही, सेबीच्या अध्यक्षा माधवी बुच आणि त्यांच्या पतीने कमी मालमत्तेसह बहुस्तरीय ऑफशोअर फंडात गुंतवणूक केल्याचा आरोप अहवालात केला आहे.