पुणे : जानेवारी ते मार्च या तिमाहीत (Quarter) देशातील घरांची विक्री (Home sales) 9 टक्क्यांनी वाढली आहे. देशातील आठ मोठ्या शहरांमध्ये 78, 627 घरांची विक्री झाली आहे, असे नाइट फ्रँक इंडियाने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे. देशभरात ही स्थिती असताना मुंबईत (Mumbai) मात्र उलट स्थिती आहे. पुण्यातही तेच झाले आहे. मुंबई शहरातील घरांची विक्री 9 टक्क्यांनी तर पुण्यातील विक्री 25 टक्क्यांनी घटल्याचे दिसत आहे. मागील आठवड्यात अॅनारॉक आणि प्रॉपटायगर या संस्थांनी गृहनिर्माण क्षेत्रातील त्यांचा डेटा जाहीर केला होता. सात शहरांती घरांची विक्री 71 टक्क्यांनी वाढून 99, 550वर गेल्याचे अॅनारॉकने म्हटले होते. प्रॉपटायगरने आठ मोठ्या शहरांतील वाढ 7 टक्के आणि घरांची विक्री 70, 623वर गेल्याचे म्हटले होते.
नाइट फ्रँकच्या अहवालानुसार, देशातल्या महत्त्वाच्या आठ शहरांमध्ये 2022च्या पहिल्या तिमाहित 78, 627 घरांची विक्री झाली. वार्षिक आधारावर ती नऊ टक्क्यांनी अधिक आहे. हा आकडा तिसऱ्या तिमाहीत कोविडपूर्व काळातील घरांच्या विक्रीपेक्षा अधिक राहिला आहे.
आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत 21, 548 घरांची विक्री झाली. इथली वृद्धी मात्र वार्षिक आधारावर नऊ टक्क्यांनी घसरली. तर पुण्यातील घरांची विक्री 25 टक्क्यांनी घसरली. येथए 10,305 घरे विकली गेली. ही मोठी घसरण आहे. कारण घरांची विक्री वाढावी, यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्कात कपात केली. मात्र त्यानंतरही ही घसरण झाली आहे.