देशातील बड्या शहरातील मालमत्तांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. तर घरांच्या किंमती पण वाढल्या आहेत. क्रेडाई कोलियर्स लायसेस फोरासच्या (CREDAI Colliers Liases Foras) अहवालानुसार, भारतातील 8 शहरात घर खरेदी करणे अत्यंत महाग झाले आहे. 2024 मधील पहिल्या तिमाहीतील आकडेवारी धडकी भरवणारी आहे. त्यानुसार, दिल्ली-एनसीआर, बेंगळुरु, अहमदाबाद, पुणे, चेन्नई, कोलकत्ता, मुंबई उपनगर, हैदराबाद आणि पुण्यात घराचं स्वप्न महागलं आहे.
किती टक्के वाढ?
बेंगळुरुमध्ये सर्वाधिक 19 टक्के तर चेन्नईत सर्वात कमी 4 टक्के घरांच्या किंमतीत वाढ नोंदविण्यात आली. याशिवाय दिल्ली-एनसीआर, बेंगळुरु, अहमदाबाद, पुणे या शहरात घराच्या किंमती भडकल्या आहेत. इतर शहरात 2 ते 7 टक्क्यांपर्यंत घरांच्या किंमतीत वाढ झाली आहे.
घर खरेदीसाठी या शहरात मोजा जादा पैसा
यापूर्वी पण वाढले होते भाव
जेव्हा 2023 च्या दुसऱ्या तिमाहीचे आकडे समोर आले. तेव्हा देशातील काही शहरातील घरांच्या किंमतीत मोठी वाढ दिसून आली. कोलकत्तामध्ये तेव्हा घराच्या किंमतीत 15 टक्क्यांपर्यंतची वाढ दिसून आली. त्यावर्षी देशाची राजधानी दिल्लीत 14 टक्के घरं महाग झाली होती. त्यावेळी पण सर्वाधिक महागडी घरं द्वारका एक्सप्रेसवे जवळच होती. ज्या गतीने घराच्या किंमती वाढत आहे, त्यावरुन या मोठ्या शहरात स्वतःचे घर घेणे अशक्य होण्याची शक्यता आहे.