कोरोनानंतर मुंबई आणि दिल्लीत घर घेणे का बनले अवघड?, परंतू देशातील या महानगरात घरांच्या किंमती खूपच कमी

| Updated on: Sep 05, 2024 | 9:02 PM

कोरोना काळानंतर ईएमआय आणि मासिक उत्पन्न यांचे गणित बिघडले असून मुंबई आणि दिल्ली महानगरातील जागांचे भाव प्रचंड वाढल्याने मुंबई किंवा दिल्लीत घर घेणे हे आवाक्याच्या पलिकडे गेले आहे.

कोरोनानंतर मुंबई आणि दिल्लीत घर घेणे का बनले अवघड?, परंतू देशातील या महानगरात घरांच्या किंमती खूपच कमी
Follow us on

देशातील मुंबई आणि दिल्ली सारख्या महानगरात जमीनीचे दर प्रचंड वाढले आहेत. गेल्या दहा वर्षात मालमत्तेचे दर प्रचंड वाढले आहे. कोरोना काळात तर घरांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. महानगरांसह छोट्या शहरातील जमीनीचे भाव प्रचंड वाढले आहेत. तुम्हाला हे वाचून आर्श्चय वाटेल की रिअर इस्टेट सेक्टरमध्ये मागणी वाढ आणि वाढत्या किंमतीमुळे चेन्नई, अहमदाबाद आणि कोलकाता या महानगरात मात्र घरे प्रचंड स्वस्त आहेत.

मॅजिक ब्रिक्सच्या वार्षिक रिपोर्टनूसार मुंबई मेट्रो पॉलिटन एरिया आणि दिल्लीत सर्वात महागडी घरे आहेत.कोरोनाकाळात देशाच्या टॉप 10 शहरातील घरगुती उत्पन्नात साल 2020 ते 2024 दरम्यान ( Compound Annual Growth Rate ) चक्रवृद्धि वार्षिक वृद्धी दर 5.4% ने (CAGR) वाढला आहे. या काळात संपत्तीच्या किंमती 9.3% टक्क्यांनी (CAGR) वाढल्या आहेत. त्यामुळे लोकांच्या खरेदी करण्याच्या क्षमतेवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे.

भारतात मालमत्तांची किंमत आणि घरगुती उत्पन्नाचे प्रमाण (P/I रेशो ) साल 2020 मध्ये 6.6 टक्क्यांहून वाढत साल 2024 मध्ये 7.5 टक्के झाला आहे. जो ग्लोबल लेव्हलवर स्वीकृत बेंचमार्क 5 पेक्षा अधिक आहे. मालमत्तेच्या बाबतीत मुंबई मेट्रो पॉलिटन एरिया (14.3) आणि दिल्ली (10.1) ही शहरे प्रचंड महागडी ठरली आहेत. आणि आश्चर्यकारक बाब म्हणजे चेन्नई, कोलकाता, अहमदाबाद ( 5) साल 2024 मध्ये घरांच्या किंमतीसाठी सर्वात स्वस्त शहरात मोडत आहेत.

ईएमआयचा बोजा वाढला

भारतात ईएमआय – टु- मासिक इन्कम रेशो साल 2020 मध्ये 46% टक्क्यांनी वाढून साल 2024 मध्ये तब्बल 61% झाला आहे. त्यामुळे घरे खरेदी करणाऱ्यांवर ईएमआयचा वाढलेला बोजा आणि विशेष करुन महानगरात राहणाऱ्या लोकांच्या आर्थिक चिंतेला दर्शवित आहे. ही प्रवृत्ती एमएमआर (116%),नवी दिल्ली (82%),गुरुग्राम (61%) आणि हैदराबाद (61%) मध्ये अधिक स्पष्ट आहे. या विपरीत स्थिती देशातील अहमदाबाद (41%), चेन्नई (41%) आणि कोलकाता (47%) सारख्या शहरांची असून येथील घरे मुंबई आणि दिल्लीच्या तुलनेत खूपच स्वस्त आहेत.