नवी दिल्ली : जगातील अब्जाधीश आणि ट्विटरचे मालक एलॉन मस्क (Twitter Elon Musk) यांना ट्विटर बिझनेस मॉड्यूलमध्ये रुपांतरीत करायचे आहे. ट्विटर ही दुभती गाय असल्याचा त्यांचा समज आहे. ट्विटर पेड ब्लू सर्व्हिसचा (Twitter Paid Blue Service) त्यांनी श्रीगणेशा केला. ट्विटरमधून धडाधड कर्मचारी घरी पाठवले. कार्यालये बंद केली. एवढंच काय फर्निचरही विकले. आता सर्व माध्यमातून खर्चात कपात करण्यात ते यशस्वी झाले. पण कमाईच्या बाबतीत मस्क याला किती फायदा, त्याला या पेड सर्व्हिसमधून किती कमाई झाली, हे या सेवेचे बोलके आकडेच सांगतात. ही सेवा सुरु होऊन आता तीन महिने झाले आहेत.
एलॉन मस्कची इच्छा आहे की सर्वच ट्विटर वापरकर्त्यांनी ब्लू बेजचा वापर करावा. ही सेवा स्वीकारावी. त्यासाठी रक्कम खर्च करावी. ताज्या आकड्यानुसार, ट्विटर ब्लूने तीन महिन्यांपासून ही सेवा सुरु केली आहे. आता पर्यंत 11 अब्ज डॉलरचे मोबाईल सदस्यत्व त्यांना मिळाले आहे. ट्विटरने ही पेड सेवा सुरु केल्यानंतर तिचा दुरुपयोग झाला. त्यामुळे ही सेवा काही काळ बंद करण्यात आली होती.
सदस्य संख्या निराशाजनक
टेकक्रंचने ऐप इंटेलिजेंस फर्म सेंसर टॉवरच्या अहवालाचा दाखला देत एक अहवाल सादर केला. त्यानुसार, ब्लू सेवाचे सदस्य अत्यंत कमी आहे. तीन महिन्यांत 11 अब्ज डॉलर आकडा अत्यंत कमी आहे. ही सदस्य संख्या केवळ मोबाईलधारकांची आहे. वेबवर आधारीत सदस्य संख्या इतकी सक्रीय नाही. जगभरातील 20 ठिकाणच्या आकड्यांचा अभ्यास अहवाल तयार करताना घेण्यात आला.
ट्विटरच्या मोबाईल ॲपवरुन युझर्सने ही सेवा खरेदी केली आहे. पडताळा केल्यानंतर ब्लू सेवा पडताळणीसह जागतिक स्तरावर उपलब्ध करून दिली आहे आणि 1 एप्रिल रोजी लेगसी चेक मार्क गायब होतील. या हालचालीमुळे ट्विटरला भविष्यात अधिक डॉलर्स कमावता येतील.माइक्रो-ब्लॉगिंग प्लेटफॉर्म ने आता दैनंदिन आणि मासिक सक्रिय वापरकर्त्यांची माहिती देणे बंद केले आहे. यापूर्वी 238 दशलक्ष कमाई करणारे सक्रिया वापरकर्ते होते.
मस्कने या डेटावर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. 1 एप्रिलपासून व्यक्तिगत वापरकर्ते आणि संस्था यांच्यासाठी लेगसी चेक मार्क गायब होतील. भारतात, ट्विटरच्या ब्लू टिकसाठी वापरकर्त्यांना वार्षिक 9,400 रुपये, म्हणजे 900 रुपये प्रति माह शुल्क द्यावे लागणार आहे. जर वापरकर्त्याने वेब ब्राउजरच्या माध्यमातून साईन अप केल्यास त्यांना प्रति माह 7 डॉलर द्यावे लागेल. तरच ब्लू व्हेरिफाईड प्राप्त करता येईल.