पेट्रोल (petrol) आणि डिझेल (diesel) 9 दिवसांत तब्बल आठ वेळा महागले आहे. वाढत्या महागाईचा आलेख कधी खाली येणार? याबाबत अद्याप कोणालाही काही सुतोवाच करता आलेलं नाही. वाढत्या इंधनाच्या दरामुळे जनता मेटाकुटीस आली आहे. रोजच इंधनाच्या (Fuel) दरात होणारी वाढ सर्वसामान्यांना परवडत नसल्याने अनेकांचा बजट कोलमडला आहे. परिवहन सेवांवरदेखील वाढत्या इंधनाचा परिणाम होत आहे. रिक्षा, खासगी बसेस आदींच्या प्रवासी भाड्यात वाढ होत असल्याने सर्वसामान्यांना इंधन दरवाढीचा दुहेरी फटका सहन करावा लागत आहे. वाढत्या इंधन दरामुळे सर्वसामान्य बेजार असताना कुठल्याच माध्यमातून यावर भाष्य होत नसल्याने हे दर कधी कमी होणार? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला भेडसावत आहे.
22 मार्च 80 पैसे
23 मार्च 80 पैसे
25 मार्च 80 पैसे
26 मार्च 80 पैसे
27 मार्च 50 पैसे
28 मार्च 30 पैसे
29 मार्च 80 पैसे
30 मार्च 80 पैसे
म्हणजेच गेल्या 9 दिवसांत इंधनाचे 8 वेळा भाव वाढले तर पेट्रोलदेखील 5 रुपये 60 पैशांनी महाग झाले आहे. निवडणुकीनंतर त्यात दररोज वाढ होत आहे.
देशात पाच राज्यांच्या निवडणुकीच्या काळात चार महिन्यांहून अधिक काळ पेट्रोल-डिझेलच्या दरात एका पैशाचीही वाढ झालेली नव्हती. पण निकाल लागताच महागाई सुसाट सुटली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये, जेव्हा कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 82 डॉलरव होती. त्यानंतर गेल्या वेळी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली. त्यानंतर 24 फेब्रुवारीपासून रशिया-युक्रेन युद्ध सुरू होईल. त्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 98 डॉलरपर्यंत राहिली. यानंतर, युद्धादरम्यानच, 8 मार्च रोजी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 130 डॉलरपर्यंत वाढवली गेली. आता हेच दर 110 डॉलरच्या जवळपास आहे. म्हणजेच पाच महिन्यांत कच्च्या तेलाच्या किंमती प्रतिबॅरल सुमारे 28 डॉलरने वाढल्या. परंतु या पाच महिन्यांत पेट्रोल कंपन्यांनी एक पैसाही इंधनात वाढ केली नव्हती. याला एकच कारण म्हणजे पाच राज्यांत निवडणुका सुरू होत्या. आता निवडणूक संपली आहे, भाव सातत्याने वाढत आहेत. आता दर आणखी किती वाढणार, हा प्रश्न आहे.
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 12 ते 14 रुपयांनी वाढ होऊ शकते. त्यानुसार बघितले तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किमान 9 रुपयांनी वाढ होऊ शकते.
‘क्रिसिल रिसर्च’च्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे, की जर कच्च्या तेलाची सरासरी 100 डॉलरवर राहिली तर किंमत 9-12 रुपये प्रतिलिटरने वाढू शकते. मात्र कच्च्या तेलाची सरासरी किंमत 110-120 डॉलर असेल तर प्रतिलिटर 15 ते 20 रुपयांनी वाढ करावी लागेल. या पार्श्वभूमीवर तेलाच्या किमतीत आणखी 15 रुपयांनी वाढ होऊ शकते.
कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजचा अहवाल सांगतो, की 100 ते 120 डॉलर्सच्या श्रेणीतील कच्च्या तेलाच्या किमतीची भरपाई करण्यासाठी तेल विपणन कंपन्या, पेट्रोलची किंमत 10 ते 22 रुपयांपर्यंत आणि डिझेल 13 रुपयांवरून 24 रुपये प्रतिलिटरपर्यंत वाढवावे लागू शकते. त्यानुसार आता पेट्रोल 17 रुपयांनी तर डिझेल 19 रुपयांनी वाढू शकते. अशी भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, मूडीज रेटिंग एजन्सीच्या म्हणण्यानुसार, पाच महिन्यांत निवडणुकीत किमती न वाढवल्यामुळे भारतातील टॉप इंधन विक्रेत्यांना सुमारे 19 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
Bank Jobs 2022: रिझर्व्ह बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! जाणून घ्या, कधी, कुठे आणि कसं करायचं अप्लाय?