नवी दिल्ली : अवघ्या 10 ते 15 हजार पगार (Payment) घेणारा व्यक्ती त्याच्या आयुष्यात कधीतरी लखपती, करोडपती होऊ शकतो का? अशी कोणती योजना आहे जी त्याला लखपती करेल. तर म्युच्युअल फंडात (Mutual Fund) गुंतवणूक (Investment) करुन तुम्हाला ही लखपती, करोडपती होता येते. त्यासाठी फार मोठ्या आणि एकरक्कमी गुंतवणुकीची आवश्यकता नाही. तर हवं सिस्टेमॅटिक प्लॅनिंग (systematic Planning)..
गुंतवणुकीसाठी खूप मोठ्या रक्कमेची गरज नाही. तर अगदी लहानात लहान रक्कमेपासूनही तुम्ही सुरुवात करू शकता. ही अल्पबचत तुम्हाला तुमचे लक्ष्य गाठण्यासाठी मदत करेल. विशेष म्हणजे एकदाच रक्कम भरण्याची गरज नाही. तुम्हाला दर महिन्याला ही रक्कम गुंतवावी लागेल.
मुलीचे लग्न, मुलाचे शिक्षण यासाठी तुम्ही प्लॅन आखात असाल तर म्युच्युअल फंडातील गुंतवणूक तुम्हाला फायदेशीर ठरू शकते. केवळ 500 रुपयांच्या गुंतवणुकीतून तुम्हाला तुमचे लक्ष्य गाठता येईल.
शेअर बाजारात थेट गुंतवणूक करणे धोक्याचे असते. म्युच्युअल फंडमधील गुंतवणूकही जोखमीची असते. पण त्यात शेअर बाजारापेक्षा कमी धोका असतो. तर परतावा ही चांगला मिळतो. त्यामुळे गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते.
म्युच्युअल फंडात SIP द्वारे गुंतवणूक करता येते. फंडातील गुंतवणूक अत्यंत सोपी आहे. कोणालाही यामध्ये गुंतवणूक करता येते. एजंटमार्फत तुम्हाला खाते उघडता येते. ब्रोकरच्या माध्यमातून ट्रेडिंग खाते उघडून एसआयपीद्वारे तर थेट म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा पर्यात खुला आहे.
मोठी रक्कम गुंतवत असाल तर त्याचा फायदाही जास्त मिळतो. जर तुम्ही 30 वर्षांचे असाल आणि दर महिन्याला 5000 रुपयांची गुंतवणूक कराल. तर 12 टक्के व्याजदराच्या अंदाजानुसार, त्या व्यक्तीला 60 व्या वर्षी 1,76,49,569 रुपये मिळतील. 15 टक्के परताव्याच्या हिशोबाने ही रक्कम वाढेल. जर तुम्ही 500 रुपयांची गुंतवणूक कराल तरीही लखपती व्हाल.