नवी दिल्ली : दिवाळी (Diwali) आता अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपली आहे. धनत्रयोदशीच्या (Dhanteras 2022) निमित्ताने देशात मोठ्या प्रमाणात सोने-चांदी (Gold-Silver) खरेदीसाठी सराफा बाजारात (Sarafa Market) खरेदीची झुबंड उडणार आहे. अशावेळी तु्म्ही सावध नसाल तर तुमची सोने खरेदीत फसवणूक होऊ शकते.
ग्राहकांना कमी शुद्धतेचे सोने माथी मारल्या जात असल्याचे लक्षात आल्यानंतर केंद्र सरकारने याप्रक्रियेत हस्तक्षेप केला.शुद्ध सोन्याच्या विक्रीसाठी सरकार आग्रही होते. 16 जून 2021 रोजी केंद्र सरकारने सर्व ज्वेलर्सला केवळ हॉलमार्कचे दागिने विक्रीसाठी बंधन घातले.
नोव्हेंबर 2019 मध्ये केंद्र सरकारने हॉलमार्किंगची घोषणा केली होती. त्यानुसार देशभरातील सोने व्यापाऱ्यांनी आभुषणे आणि दागिन्यांवर हॉलमार्किंग करावे असा निर्णय जाहीर केला होता. 15 जानेवारी 2021 रोजीपासून हा निर्णय अनिवार्य करण्यात आला होता. या निर्णयालाही मुदत वाढ देण्यात आली होती.
दरम्यान केंद्र सरकारने सोने-चांदीच्या हॉल मार्किंगच्या शुल्कात वाढ केली आहे. भारतीय मानक ब्यूरोने (BIS) एक अधिसूचना दिली. त्यानुसार, सोन्याच्या दागिन्यासाठी हॉलमार्किंग शुल्क 35 रुपये ते 45 रुपये झाले आहेत. त्यामुळे दागिने तयार करण्यासाठी आता जादा रक्कम मोजावी लागणार आहे.
तर चांदीचे आभुषण आणि दागिन्यांवर हॉलमार्किंगसाठी 25 ते 35 रुपये प्रति दागिने चार्ज द्यावा लागेल. त्यामुळे सोने आणि चांदीच्या दागिन्यांवर आता जादा शुल्क मोजावे लागणार आहे.
सोने आणि चांदीवरील हॉलमार्किंग शुल्काची (Gold Hallmarking Charges) गणना मान्यता प्राप्त तुकड्यांच्या वजनानुसार केली जाते. शुल्काची गणना दागिने आणि आभुषणाच्या वजनानुसार करण्यात येत नाही.
सर्व हॉलमार्क असलेल्या सोन्याच्या दागिन्यांमध्ये बीआयएस लोगो, शुद्धतेचा ग्रेड आणि सहा अंकांचा अल्फान्यूमेरिक कोड असतो. त्याला HUID असे ही म्हणतात. ज्वेलर्स सोने वितळवून त्यापासून भारतीय मानक आईएस 1417:2016 नुसार, ग्रेड 14, 18 वा 22 कॅरेटचे दागिने तयार करु शकतात.
हॉलमार्किंगच्या चिन्हाविषयी 1 जुलै 2021 रोजी सुधारणा करण्यात आली होती. पूर्वी हॉलमार्किंगमध्ये चार चिन्हं होती. आता तीन चिन्हं असतील. बीआयएस हॉलमार्क लोगो, शुद्धतेचा ग्रेड आणि 6 अंकांचा अल्फान्यूमेरिक कोड अशी ही तीन चिन्हं असतील.