नवी दिल्ली: आर्थिक व्यवहारांसाठी पॅन कार्ड आवश्यक असतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. सुरुवातीच्या काळामध्ये नवीन पॅन कार्ड बनवण्यासाठी बराच वेळ लागत होता. मात्र, आता नवीन पॅन कार्ड बनवण्याच्या प्रक्रियेसाठी जास्त वेळ किंवा काळ जात नाही. तुम्ही तुमच्या आधार कार्ड नंबरद्वारे काही मिनिटांमध्ये इन्स्टंट पॅन कार्ड जनरेट करू शकता. आधार कार्डद्वारे इन्स्टंट पॅन कार्ड बनवण्याची सुविधा मोफत आहे. (How to get instant Pan Card with help of Aadhar Card at free of Cost)
आयकर विभागाकडून प्रत्येक नागरिकाला दहा अंकी क्रमांक असलेला कायम खाते नंबर दिला जातो. त्याला परमनंट अकाऊंट नंबर असंदेखील म्हणलं जातं. इन्स्टंट पॅन कार्ड साठी आधार कार्ड द्वारे अर्ज केल्यास दहा मिनिटांमध्ये पीडीएफ फॉरमॅटमध्ये आधार कार्ड आपल्याला मिळून जाते.
नवीन पॅन कार्ड मिळवण्यासाठी आपल्याला इनकम टॅक्स विभागाच्या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. तिथे भेट दिल्यानंतर न्यू पॅन यासाठी अर्ज करावा लागेल. त्यानंतर पुढे तुमचा बारा अंकी आधार कार्ड नंबर द्यावा लागेल. मात्र, यावेळी तुमच्या आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे. कारण केवायसी पूर्ण करण्यासाठी पाठवला जाणार ओटीपी तुमच्या मोबाईल क्रमांकावर येतो.
स्टेप 1: सर्वप्रथम इन्कम टॅक्स विभागाच्या ई फाइलिंग पोर्टलला भेट द्या.
स्टेप 2: इथे इन्स्टंट पॅन कार्ड आधार या ऑप्शन वर क्लिक करा
स्टेप 3: पुढे गेट न्यू पॅन कार्ड वर क्लिक करा त्यानंतर नव्या पॅनकार्डसाठी आधार क्रमांक नोंद करा
स्टेप 4: कॅपचा कोड टाकून आधार ओटीपी जनरेट करा तो तुमच्या मोबाईल फोनवर येईल त्यानंतर ओटीपी व्हेरिफाय करा आणि आधार डिटेल्स प्रमाणित करा.यानंतर तुम्ही पॅन कार्ड डाउनलोड करु शकता.
तुम्ही पॅन कार्ड पीडीएफ फॉरमॅट मध्ये डाऊनलोड करू शकता. यासाठी चेक स्टेटस किंवा डाऊनलोड पॅनवर तुमचा आधार नंबर नोंदवावा लागेल. याशिवाय तुमचा ई-मेल आयडी आधार क्रमांकाशी संलग्न असेल तर तुम्हाला पीडीएफ फॉर्मेट मधील पॅनकार्ड इमेल वर देखील उपलब्ध होईल.
संबंधित बातम्या
अन्यथा Deactivate होईल तुमचं पॅन कार्ड, आयकर विभागाने दिली महत्त्वाची माहिती
आधार कार्ड डाऊनलोड करण्याचा सर्वात सोपा मार्ग; फक्त करा एक काम