तुमच्या PF वर व्याज मिळतंय की नाही? सोप्या पद्धतीने चेक करा

| Updated on: Jan 16, 2021 | 3:51 PM

ईपीएफओच्या भविष्य निर्वाह निधी अर्थात प्रोव्हिडंट फंडशी संबंधित कोणतीही तक्रार तुम्ही घरबसल्या ऑनलाईन दाखल करू शकता.

तुमच्या PF वर व्याज मिळतंय की नाही? सोप्या पद्धतीने चेक करा
Follow us on

मुंबई : भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ (PF) हा नोकरदार लोकांसाठी बचतीचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. या बचतीमुळे केवळ त्यांच्या भविष्यातील चिंता दूर होत नाही, तर सरकार त्यावर 8.5 टक्के व्याजही देते. आता सर्व पीएफ खातेधारकांना त्यांच्या व्याजाचे पैसे एकरकमी मिळतील, असे नुकतेच सरकारने जाहीर केले होते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या पीएफ खात्यात व्याज मिळालं नसेल, तर काळजी करू नका. आता आपण घर बसल्या याबद्दल तक्रार करू शकता. ज्यावर त्वरित तोडगा काढला जाईल (How to submit PF related complaints and queries).

जर तुमच्या पीएफ खात्यात व्याजाचे पैसे जमा झाले नसतील, तर ईपीएफओच्या भविष्य निर्वाह निधी अर्थात प्रोव्हिडंट फंडशी संबंधित कोणतीही तक्रार तुम्ही घरबसल्या ऑनलाईन दाखल करू शकता. ईपीएफओने ही प्रक्रिया अत्यंत सोपी केली आहे. आपण अवघ्या काही मिनिटांतच सोप्या स्टेप्स फॉलो करून या संबंधी तक्रार दाखल करू शकता.

येथे करा तक्रार :

प्रोव्हिडंट फंडशी संबंधित कोणत्याही समस्येसाठी आपण ग्रीव्हन्स मॅनेजमेंट सिस्टमद्वारे आपली तक्रार नोंदवू शकता. याशिवाय ईपीएफओच्या ट्विटर हँडल @socialepfo वर ट्विट करुन आपण आपली तक्रार नोंदवू शकता. आपली तक्रार नोंद होताच, त्यावर त्वरित कारवाई सुरू केली जाईल (How to submit PF related complaints and queries).

अशाप्रकारे दाखल करू शकता तक्रार :

– आपली तक्रार नोंदवण्यासाठी प्रथम ईपीएफओ वेबसाईटवरील ग्रीव्हन्स सेल epfigms.gov.in  यावर क्लिक करा.

– संबंधित तक्रार नोंदवण्यासाठी तुम्हाला तुमचा पीएफ क्रमांक किंवा यूएन क्रमांक येथे द्यावा लागेल.

– सदर क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर, सिक्युरिटी कोड भरा आणि ‘Get Details’ वर क्लिक करा

– तपशील भरल्यानंतर आपल्याला एक ओटीपी मिळेल. एकदा ओटीपीची पडताळणी झाली की, तुमची सर्व माहिती तुमच्या समोर दिसेल.

– यानंतर, आपण आपली तक्रार नोंदवण्यासाठी ड्रॉप डाऊनमधून पर्याय निवडू शकता.

– तक्रार नोंदवल्यानंतर Add बटणावर क्लिक करून सबमिट करा.

तक्रारीची स्थिती तपासण्यासाठी :

तक्रार नोंदवल्यानंतर आपण त्या तक्रारीची स्थिती देखील तपासू शकता. यासाठी तुम्हाला कोठेही जाण्याची गरज नाही. आपण ईपीएफओ वेबसाईटवरच हे तपासू शकता. वेबसाईटच्या ग्रीव्हन्स सेक्शनमध्ये ‘View Status’मध्ये याची माहिती पाहू शकता. त्यावर क्लिक करून आपण आपल्या तक्रारीची सद्यस्थिती पाहू शकता.

(How to submit PF related complaints and queries)

हेही वाचा :

Pan Card | एकही रुपया खर्च न करता केवळ 5 मिनिटांत बनेल ‘पॅन कार्ड’, जाणून घ्या कसे…

चेक भरण्याची योग्य पद्धत; एक चूक आणि खाते होणार रिकामं