नवी दिल्ली : आजकाल महिलाही व्यवसायात उत्तुंग भरारी घेऊ लागल्या आहेत. हम भी कुछ कमी नहीं… याचा प्रत्यय महिलांच्या कृतीतून दिसत आहेत. ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. याचवेळी व्यवसायात स्वत:ला अजमावणार्या, या क्षेत्रात नव्याने पाऊल टाकणाऱ्या महिलांनी नेमक्या कशा पद्धतीने व्यवसाय सुरू केला पाहिजे हे जाणून घ्यायला हवे. कुठल्याही व्यवसायात पाऊल ठेवायचे झाले तर सुरुवातीपासूनच त्या व्यवसायाशी संबंधित आर्थिक गणिते जाणून घेतली पाहिजे, आपण योग्य पद्धतीने आर्थिक नियोजन केले पाहिजे. योग्य आर्थिक नियोजनाशिवाय व्यवसायात यश साधता येणार नाही. वास्तविक महिलांवर घराचीही जबाबदारी असते. त्यांना घर सांभाळून व्यवसाय करावा लागतो. या पार्श्वभूमीवर घरदार सांभाळून व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी व्यवसायाचे आर्थिक नियोजन इतरांच्या तुलनेत थोड्या वेगळ्या पद्धतीने केले पाहिजे. (How women can start their own business; know the secret to success)
व्यावसायिक महिलांनी आपल्या व्यवसायासह कुटुंबाचा आर्थिक खर्चदेखील पाहावा. खर्चाबरोबरच पैशांची बचत करण्यावरही लक्ष केंद्रित करा. पैशांची डायरी ठेवा. क्रेडिट कार्डचा अनावश्यक वापर टाळा. व्यवसायासह वैयक्तिक खर्च संतुलित करा.
व्यवसाय कजार्साठी चांगला क्रेडिट स्कोअर आवश्यक आहे. बिले वेळेवर द्या, आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडा. व्यवसायासाठी असुरक्षित कर्ज घेणे टाळा. क्रेडिट कार्डचा वापर मर्यादित करा. आपला क्रेडिट स्कोअर सुधारण्यावर लक्ष केंद्रित करा.
बँक आणि एनबीएफसीकडून व्यवसाय कर्ज घेतले जाऊ शकते. महिलांसाठी अनेक विशेष व्यवसाय कर्ज योजना आहेत. बँकांकडून विशेष कर्ज योजना दिल्या जात आहेत. बँक ऑफ बडोदाने ‘वैभव लक्ष्मी’ योजना सुरू केली आहे. विजया बँकेची ‘व्ही शक्ती’ देखील महिलांसाठी आहे. महिलांना या योजनांमध्ये अनेक फायदे मिळतात.
व्यवसायासह स्वत: ची काळजी घेणे देखील महत्वाचे आहे. स्वत:ची काळजी घेण्यासाठी विमा घेणे महत्वाचे आहे. वैद्यकीय विम्यासह जीवन विमा घ्या. व्यवसायावर लक्ष द्या. परंतु स्वत:ची काळजीदेखील घ्या.
व्यवसाय काय आहे हे महत्त्वाचे नाही, त्यात काहीही निश्चित नसते. त्यामुळे अचानक गरजेसाठी विशिष्ट निधी असणे आवश्यक आहे. खडतर अर्थात अडीअडचणीच्या परिस्थितीत आपत्कालीन निधी राखणे फायद्याचे आहे. हा फंड छोट्या किंवा मोठ्या व्यवसायाच्या गरजेसाठी नाही. व्यवसायासाठी आपत्कालीन निधी वापरणे टाळा.
सेवानिवृत्तीचे नियोजन हा आर्थिक नियोजनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही परिस्थितीत सेवानिवृत्ती बचत व्यवसायात गुंतवू नका. व्यवसायानंतर सेवानिवृत्तीसाठी सतत गुंतवणूक सुरू ठेवा. सेवानिवृत्ती व इतर आर्थिक उद्दीष्टांसाठीही गुंतवणूक सुरू ठेवा.
व्यवसाय आणि वैयक्तिक खर्च स्वतंत्र ठेवा. व्यवसाय- वैयक्तिक आयुष्य वेगळे ठेवणे आवश्यक आहे. याबरोबरच गुंतवणूक कुठे करावी? हेही समजून घ्या. व्यवसायातून तुम्हाला चांगला फायदा झाला आहे. या फायद्यातून हाती लागलेले पैसे बँकेत ठेवण्याऐवजी लिक्विड फंडात गुंतवणूक करा. पारंपारिक योजनांच्या तुलनेत तुम्हाला चांगले उत्पन्न मिळेल.
आपल्या पोर्टफोलिओमध्ये विविधता राखणे महत्वाचे आहे. इक्विटी, म्युच्युअल फंड, पीपीएफमध्ये गुंतवणूक करा. गुंतवणूकीतील विविधता जोखीम कमी करण्यास मदत करते. पारंपारिक बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर नाही. याचवेळी आर्थिक नियोजनासाठी नियोजक हे खूप महत्वाचे आहे. आर्थिक नियोजक खर्च-गुंतवणूकीबाबत मार्गदर्शन करेल. एखाद्या योजनेच्या मदतीने आर्थिक व्यवस्थापन करणे सोपे होईल. (How women can start their own business; know the secret to success)
Gemini/Cancer Rashifal Today 22 June 2021 | नोकरीत चढउतार असतील, विवाहबाह्य प्रेम प्रकरणांपासून दूर राहा#Horoscope | #DailyHoroscope | #राशीफल | #राशीभविष्य | #राशिफल | #Tuesday https://t.co/Nba28al2jA
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 21, 2021
इतर बातम्या
Video | स्वत:ला सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न, शेवटी व्हायचं तेच झालं, दोन महिलांचा व्हिडीओ व्हायरल
राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका, लस घेणं अत्यावश्यक; आमदार रमेश पाटलांचे नागरिकांना आवाहन