Hurun Global Rich List 2023 : टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीत अंबानी एकमेव भारतीय, अदानींचे स्थान 23 व्या क्रमांकावर घसरले

| Updated on: Mar 23, 2023 | 5:19 PM

सध्या संकटात सापडलेल्या गौतम अदानी एण्ड फॅमिली यांच्या संपत्तीत 35 टक्के घट झाली आहे. त्यांना आपले दुसरे स्थान गमावावे लागले आहे.

Hurun Global Rich List 2023 : टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीत अंबानी एकमेव भारतीय, अदानींचे स्थान 23 व्या क्रमांकावर घसरले
mukesh-ambani-pti
Image Credit source: mukesh-ambani-pti
Follow us on

मुंबई : जगभरातील श्रीमंत अब्जाधीशांची यादी जाहीर करणाऱ्या ‘ हुरुन ग्लोबल रिच लीस्ट – 2023’  मध्ये यावेळी जगातील टॉप टेन अब्जाधीशांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी या एकमेव भारतीय उद्योगपतीची निवड झाली आहे. गौतम अदानी एण्ड फॅमिली या वर्षी अब्जाधीशांच्या यादीत 23 व्या क्रमांकावर घसरली आहे. नव्या यादीनूसार मुकेश अंबानी पुन्हा देशातील नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

‘ हुरुन ग्लोबल रिच लीस्ट – 2023 ‘ मध्ये समाविष्ठ असलेले रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत यंदा 20 टक्के म्हणजेच 82  अब्ज अमेरिकन डॉलरचे नुकसान झाले आहे. असे असले तरी ते लागोपाठ तिसऱ्या वर्षी सर्वात श्रीमंत आशियाई बनले आहेत. भारतातील अब्जाधीशांची यादी एकूण 28  बनली आहे. 187 अब्जाधीशांच्या यादीत भारताचे स्थान केवळ चीन आणि अमेरिका या दोन देशानंतरचे आहे.

भारतात कोरोनाची लसी तयार करणारे सायरस पुनावाला आणि उद्योगपती शिव नाडर एण्ड फॅमिली या यादीत अनुक्रमे 46  व्या आणि 50 व्या क्रमांकावर आले आहेत. यंदा एकूण 15 नवे भारतीय या अब्जाधीशांना या यादीत स्थान मिळाले आहे. सध्या संकटात सापडलेल्या गौतम अदानी एण्ड फॅमिली यांच्या संपत्तीत 35 टक्के घट झाली आहे. त्यांना आपले दुसरे स्थान गमावावे लागले आहे. अदानींना हा झटका हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर बसला आहे.

मुंबई अब्जाधीशांचे घर….

देशात सर्वाधिक अब्जाधीश आर्थिक राजधानी मुंबईत रहात आहेत, मुंबईत एकूण 66 अब्जाधीश राहतात. त्यानंतर देशाची राजकीय राजधानी दिल्लीत 39 आणि बंगळूरूत 21अब्जाधीश राहतात. हेल्थकेअर तसेच कंझ्यूमर गुड्स आणि केमिकल्स तसेच रिटेल सेक्टरमध्ये सर्वात जास्त अब्जाधीश उद्योगपती आहेत. 27 अब्ज अमेरिकन डॉलरच्या संपत्तीमुळे भारताचे लस सम्राट सीरम इन्स्टिट्यूटचे सायरस पुनावाला जगातील सर्वात मोठे हेल्थकेअर सेक्टरमधील श्रीमंत उद्योगपती ठरले आहेत. त्यानंतर फार्मास्युटीकल इंडस्ट्रीजचे दिलीप शांघवी एण्ड फॅमिलीचा ( $ 17 अमेरिकन डॉलर ) नंबर लागतो.

जगातील श्रीमंत अब्जाधीशांत भारताचे योगदान वाढले

गेल्या पाच वर्षांत जागतिक अब्जाधीशांच्या संख्येत भारताचा वाटा लागोपाठ वाढतच आहे. भारतात जगाच्या तुलनेत आठ टक्के अब्जाधीश आहेत, पाच वर्षांपूर्वी हा वाटा केवळ 4.9 टक्के होता. गेल्या दहा वर्षांत पाच अब्ज अमेरिकन डॉलर संपत्तीवाल्या अब्जाधीशांची संख्या दोन पट वाढली आहे. हुरून ग्लोबल रिच लिस्ट – 2023 यादीनूसार गेल्या वर्षीच्या तुलनेत अब्जाधीशांच्या संख्येत 8 टक्क्यांनी घट झाली आहे. तसेच त्यांच्या एकूण संपत्तीत देखील 10 टक्के घट झाली आहे.

भारतीय अब्जाधीशांची संपत्ती 

ग्लोबल रॅंक 9   –   मुकेश अंबानी – ( 82 अब्ज डॉलर ) – रिलायन्स,  ग्लोबल रॅंक  23    – गौतम अदानी – ( 53 अब्ज डॉलर ) – अदानी, ग्लोबल रॅंक 46   – सायरस पुनावाला – ( 27 अब्ज डॉलर ) – सीरम, ग्लोबल रॅंक 50   – शिव नाडर – ( 26 अब्ज डॉलर ) – एचसीएल, ग्लोबल रॅंक 76  – लक्ष्मी मित्तल – ( 20 अब्ज डॉलर ) – ArcelorMittal, 76  ग्लोबल रॅंक- एस.पी. हिंदूजा – ( 20 अब्ज डॉलर ) – हिंदुजा, ग्लोबल रॅंक 76  – दिलीप संघवी – ( 17 अब्ज डॉलर ) – सन फार्मास्युटिकल, ग्लोबल रॅंक 107  – राधाकृष्ण दमानी – ( 16 अब्ज डॉलर ) – एवेन्यू सुपरमार्ट, ग्लोबल रॅंक 135  – कुमार मंगलम बिर्ला – ( 14 अब्ज डॉलर ) – आदित्य बिर्ला, ग्लोबल रॅंक  135  – उदय कोटक – ( 14 अब्ज डॉलर ) – कोटक महिंद्र