नवी दिल्ली | 5 ऑक्टोबर 2023 : भारतीय अर्थव्यवस्था (Indian Economy) सध्या जोमात आहे. जग मंदीच्या विळख्यात जात असताना भारतीय अर्थव्यवस्था जगासाठी कौतुकाचच नाही तर संशोधनाचा विषय ठरली आहे. क्रिकेटचा महाकुंभाला (ICC World Coup 2023) भारतात सुरुवात झाली आहे. टीम इंडियाचा पहिला सामना तीन दिवसांनी, 8 ऑक्टोबरला रंगणार आहे. भारत- ऑस्ट्रेलियाला झुंजवेल. या दीड महिन्यात देशात उत्सव असेल. विश्वचषकाचा हा आनंद दिवाळीमुळे द्विगुणित होणार आहे. देशातील बाजारपेठेत तुफान येणार आहे. या कुंभमेळ्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला अजून हातभार लागेल. अर्थव्यवस्था जोमात वाढेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. पर्यटन, हॉटेलिंग, स्थानिक बाजारांमध्ये मोठी घडामोड दिसेल. पैशांचा पाऊस पडेल. मोठ्या उलाढाली होतील.
हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात वाढ
देशातील 10 महत्वाच्या शहरात हे सामने रंगणार आहेत. 5 ऑक्टोबर सुरु होणारा हा उत्सव नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत चालणार आहे. देशातील आणि परदेशातील पर्यटक याकाळात या शहरात असतील. त्यामुळे या शहरातील सर्वच उद्योगांना मोठा हातभार लागेल. खासकरुन पर्यटन, हॉटेलिंग आणि स्थानिक बाजारपेठांमध्ये उलाढाल वाढेल. हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात घडामोड दिसेल.
पैशांचा महापूर
भारतात क्रिकेट विश्वचषकामुळे पैशांचा महापूर येईल. 2019 मध्ये 552 दशलक्ष रुपयांचा महसूल मिळाला होता. यावेळी हे सर्व रेकॉर्ड मोडीत निघतील. भारतीय अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. टीव्ही राईट्स आणि स्पॉन्सरशीपमधून 10,500 कोटी ते 12,000 कोटी रुपये उत्पन्न मिळेल. 2011 नंतर पहिल्यांदा भारतात क्रिकेटचा महाकुंभ भरला आहे.
आईसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2023 शेड्यूल
या विश्वचषकासाठी एकूण 48 सामने खेळण्यात येतील. यापूर्वीचा विजेता इंग्लंड आणि न्युझीलंड यांच्यामध्ये पहिला सामना 5 ऑक्टोबर 2023 रोजी खेळला जाईल. भारत आणि पाकिस्तानमधील चुरशीचा सामना 14 ऑक्टोबर 2023 रोजी अहमदाबादमध्ये होईल. अनेक सामने दिवस-रात्रीत होतील.
20,000 कोटींचा पाऊस
वर्ल्डकपमुळे भारतात महागाई वाढण्याची भीती आहे. विमानाचे तिकीट, हॉटेलचे भाडे, रेस्टॉरंट, पब, डिस्को, स्ट्रीट फूड या काळात महागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अर्थात हा सर्व बदल ज्या शहरात क्रिकेटचे सामने खेळविण्यात येत आहेत. त्या 10 शहरात दिसतील. या काळात महागाई 0.15-0.25 टक्के वाढण्याची शक्यता आहे. क्रिकेट वर्ल्डकपमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला 20,000 कोटींचे बुस्टिंग मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.