मुंबई: उन्हाळ्याच्या झळा आता जाणवायला सुरुवात झाली आहे. नागरिक उन्हाळ्यात थंड पदार्थ, आईसक्रीम थंडगार रस, शीतपेय पिण्यास प्राधान्य देतात. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात आईसक्रीमचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भारतातील लोक जेवण केल्यानंतर गोड पदार्थ खाण्याला प्राधान्य देतात. उन्हाळ्यात आईसक्रीमची मागणीदेखील प्रचंड वाढलेली असते. यामुळं उन्हाळा सुरु होत असताना तुम्ही व्यवसाय सुरु करत असाल तर आईसक्रीम विक्री हा चांगला पर्याय आहे. भारतातील उद्योग जगतातील संस्था FICCI नं त्यांच्या रिपोर्टमध्ये 2022 पर्यंत देशात आईसक्रीमच्या व्यवसाय एक अब्ज डॉलरवर पोहचेल, असं म्हटलं. (ice cream business plan investment on for starting time)
गेल्या 10 वर्षांमध्ये आईसक्रीम व्यवसायामध्ये मोठे बदल झाले आहेत. भारतीय ग्राहक आता महागडी आईसक्रीम देखील खरेदी करताना पाहायला मिळतात. जर तुम्हाला आईसक्रीम व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्याविषयी माहिती तुम्हाला देत आहोत.आईसक्रीम व्यवसाय सुरु करताना सुरुवातीला ठिकाण, साहित्य, मनुष्यबळ, मार्केटिंग, परवाने या गोष्टी गरजेच्या आहेत.
ठिकाण
आईसक्रीम शॉप सुरु करायचे असले तर तुमच्याकडे 400 ते 500 स्क्वेअर फुट कार्पेट जागा असणारा दुकान असणं आवश्यक आहे. दुकानामध्ये 5 ते 10 लोकांची बसण्याची व्यवस्था असणं आवश्यक आहे. आईसक्रीम शॉप बाजारपेठेत, शॉपिंग मॉल, शाळा, कॉलेज परिसरात असलं पाहिजे. यासाठी तुम्हाला 55 हजार ते 1.50 लाखांपर्यंत खर्च येऊ शकतो.
रेफ्रिजरेटर घ्यावा लागेल
आईसक्रीम पार्लरमध्ये सर्वात महत्वाचा उपकरणं म्हणजे कोल्ड स्टोन रेफ्रिजरेटर तुम्हाला खरेदी करावा लागेल. यासाठी तुम्हाला 2 ते 2.5 लाख रुपये गुंतवावे लागतील. याशिवाय पॅकेजिंग साहित्य, काही भांडी खरेदी करावी लागतील. आईसक्रीम पार्लरमध्ये 24 तास वीजेचा पुरवठा असणं आवश्यक आहे.
ग्राहकांना आईसक्रीम देण्यासाठी तुम्हाला कच्चा माल खरेदी करावा लागणार आहे. आईस्क्रीम टब, वॉफल कोन्स, नटस, चोको चिप्स, व्हीप्ड क्रीम, हॉट चॉकलेट यासारख्या वस्तूंची आवश्यकता असेल. सुरुवातीला आपल्याला यावर 1.5 ते 2 लाख रुपये खर्च करावे लागतील.
मनुष्यबळ
आईसक्रीम शॉपमध्ये काम करण्यासाठी तुम्हाला 5 ते 7 व्यक्तींची गरज आहे. मात्र, भांडवल कमी असल्यास तुम्ही छोट्या टीमच्या साथीनं काम सुरु करु शकता .
मार्केटिंग
व्यवसाय वाढविण्यासाठी हा सर्वात महत्वाची बाब आहे. आपण किती कमाई करू शकतो हे केवळ मार्केटिंग ठरवेल. पार्लरच्या आतील डिझाईनिंगवर ब्रँडिंगपासून आपणास खर्च करावा लागतो. आपण इच्छित असल्यास, आपण हे मार्केटिंग व्यावसायिकांच्या मदतीने करू शकता. पहिल्या तीन महिन्यांसाठी तुम्हाला सुमारे 2 ते 3 लाख रुपये खर्च करावे लागतील.
आईस्क्रीम पार्लर व्यवसाय उघडण्यासाठी आपल्याला काही परवाने घ्यावे लागतील. तुम्हाला FSSAI कडून परवाना घ्यावा लागेल. FSSAI 15 अंकी रजिस्ट्रेशन नंबर जारी करते. आपण तयार केलेले खाद्यपदार्थ एफएसएसएआयच्या गुणवत्तेच्या दर्जाचे असल्याचं स्पष्ट होतं. तुमच्याकडे आगप्रतिबंधक व्यवस्था देखील असली पाहिजे.
फ्रँचायझी
अमूल कंपनी तुम्हाला फ्रँचायझीद्वारे आइस्क्रीम व्यवसाय करण्याची संधी देते. अमूलचे आईस्क्रीम आउटलेट सुरू करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला दोन लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
‘हे’ रेस्टॉरंट हेलिकॉप्टरने फूड डिलिव्हरी करणार? सोशल मीडियावर जाहिरात#SavourFoods #FoodDelivery #OnlineFoodhttps://t.co/Cb0EMIAxE6
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 2, 2021
संबंधित बातम्या:
मनात आणलं तर या व्यवसायात लाखापर्यंत कमवाल, खूप फायद्याची आहे बिझनेस आयडिया
नोकरी सोडून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, रोज कमवाल 4000 रुपये
ice cream business plan investment starting time for summer
(ice cream business plan investment on for starting time for summer)