मुंबई : सरकारी बँकेतून खासगी बँकेत रुपांतर झालेल्या आयडीबीआय बँक (IDBI Bank) ग्राहकांना अनेक सुविधा पुरवते. आयडीबीआय बँक ग्राहकांना त्यांची कष्टाची कमाई मासिक हप्त्यांच्या माध्यमातून वाढवण्याची संधी देते आहे. यासाठी आयडीबीआय बँकेने एक विशेष एसएसपी प्लस (SSP+) योजना आणली आहे. या विशेष योजनेद्वारे ग्राहकांना नियमित बचतीचा लाभ मिळतो. त्यासोबतच पाच लाख रुपयांची खास सुविधादेखील मिळते. नुकतंच आयडीबीआय बँकेने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. ही योजना नेमकी काय? याचा फायदा काय? चला जाणून घेऊया…(IDBI Bank SSP Plus scheme)
IDBI ची सिस्टमॅटिक सेविंग्स प्लॅन (SSP) तुम्हाला तुमच्या सोयीनुसार बचतीची सुविधा देते. तुम्ही तुमच्या नियमित उत्पन्नासह दर महिना एक निश्चित रक्कम जमा करु शकता. तुम्ही निश्चित केलेली रक्कम दर महिना तुमच्या अकाऊंटमध्ये वजा केली जाते.
IDBI Bank SSP Plus- Grow your hard-earned money through easy monthly installments. Enjoy Regular Savings with
✅Principal Plus Interest Protection
✅Plus Complimentary Insurance Cover upto ₹5 lakhs
✅Plus Upto 1,000 Redeemable Reward Points pic.twitter.com/VLYf3i5oSW— IDBI BANK (@IDBI_Bank) April 20, 2021
SSP प्लस प्रिंसिपल + इंट्रेस्ट प्रोटेक्शनसोबत कॉम्प्लिमेंट्री विमा संरक्षण आणि Reward Points सोबत नियमित बचत सुविधा करते.
सिस्टमॅटिक सेविंग्स प्लॅन (SSP) अर्ज करणे अगदी सोपे आहे. यासाठी नेट बँकिंग/ Go Mobile + अॅपद्वारे आपण ऑनलाईन अर्ज करु शकता. आपण बँकेच्या जवळच्या शाखेत भेट देऊ शकता. (IDBI Bank SSP Plus scheme)
संबंधित बातम्या :
कर्ज देताना तपासला जाणारा CIBIL स्कोअर काय असतो? Credit आणि CIBIL मध्ये फरक काय?
RBI आणखी एका बँकेचा परवाना रद्द करण्याच्या तयारीत, ग्राहकांचं काय होणार?
अमेरिकेचा मोठा झटका, भारताला ‘करन्सी मॅनिप्युलेटर्स’च्या यादीत टाकलं, नेमका काय परिणाम होणार?