Petrol Diesel Price Today : कच्चा तेलाच्या किंमती घसरल्याने राज्यात परभणी वगळता इतर शहरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरण झाली आहे. सर्वात स्वस्त इंधन ठाणे आणि पुणे येथे मिळत आहे.
Ad
आज कुठे स्वस्त, कुठे महाग
Follow us on
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण झाली. आज या भावात किचिंत वाढ झाली. तरीही किंमती आटोक्या असल्याचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला. भारतीय तेल विपणन कंपन्यांनी सकाळीच भाव जाहीर केले. त्यानुसार कच्चा तेलाच्या किंमती घसरल्याने राज्यात परभणी वगळता इतर शहरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत घसरण झाली आहे. सर्वात स्वस्त इंधन ठाणे आणि पुणे येथे मिळत आहे. भारताने रशियाकडून क्रूड ऑईलची(Crude Oil) आयात वाढवल्यानंतर इराकने स्वस्तात इंधनाचा पुरवठा सुरु केला आहे. आज तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव (Petrol-Diesel Price) काय आहे.
कच्चा तेलाचा भाव काय
18 एप्रिल रोजी, डब्ल्यूटीआई क्रूड ऑईलमध्ये (WTI Crude Oil) घसरण झाली. त्यामुळे हा भाव 80.72 डॉलरवर पोहचला. तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) घसरुन 84.60 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. दरवाढीमुळे देशातील काही शहरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती बदलल्या आहेत. काही राज्यात इंधन स्वस्त तर काही शहरात इंधनाचे दर वाढले आहेत. पुणे आणि ठाण्यात पेट्रोल अनुक्रमे 105.84 आणि 105.97 रुपये लिटर तर डिझेल 92.36 रुपये आणि 92.47 रुपये प्रति लिटर आहे.