PF Account : जर हे दोन डिटेल बरोबर असतील तर पैसे काढण्यात अडचण येणार नाही, आधीच तपासून पहा या गोष्टी!

| Updated on: May 23, 2021 | 5:50 PM

आपण दोन गोष्टींची काळजी घेतली तर आपला क्लेम रिजेक्ट होण्याची शक्यता बरीच कमी होते आणि आपण आपला बँक बॅलन्सही चेक करु शकता. (If these two details are correct then there is no problem in withdrawing money, check in advance)

PF Account : जर हे दोन डिटेल बरोबर असतील तर पैसे काढण्यात अडचण येणार नाही, आधीच तपासून पहा या गोष्टी!
हा 12 अंकी खास नंबर गमावल्यास थांबू शकते पेन्शन
Follow us on

मुंबई : नोकरदार वर्गासाठी पीएफ म्हणजे जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यांच्यासाठी पीएफ ही केवळ गुंतवणूक नाही तर आर्थिक अडचणीच्या काळातील व्यवस्था आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे आपण त्यात गुंतवणूक म्हणून पैसे जमा करत रहा, यावर आपल्याला चांगले व्याज मिळते. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत आपण हे पैसे देखील काढू शकता. जेव्हा तुम्हाला पैशांची गरज असते आणि आपण पीएफसाठी अर्ज करता तेव्हा कधीकधी अपूर्ण माहितीमुळे पैसे अडकतात किंवा क्लेम मिळत नाही. यासाठी आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे, ज्यामुळे पैसे काढताना आपल्याला कोणतीही अडचण होणार नाही. आपण दोन गोष्टींची काळजी घेतली तर आपला क्लेम रिजेक्ट होण्याची शक्यता बरीच कमी होते आणि आपण आपला बँक बॅलन्सही चेक करु शकता. (If these two details are correct then there is no problem in withdrawing money, check in advance)

दोन कारणे कोणती आहेत?

अनेकदा असे होते की, आपण पीएफसाठी क्लेम करतो, पण आपला क्लेम रिजेक्ट होतो. याची अनेक कारणे असू शकतात. पण, याची दोन मोठी कारणे आहेत. पहिले आपले केवायसी पूर्ण झाले नाही. दुसरे म्हणजे, आपण अद्याप युएएन(UAN)ला आधारशी जोडलेला नाही. जर केवायसी केले नाही तर आपणास अडचणींचा सामना करावा लागू शकतो, म्हणून प्रथम केवायसी करा जेणेकरून आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही.

युएएन(UAN)सोबत आधार लिंक करणे देखील बंधनकारक आहे आणि आपण आपले पॅनकार्डही त्यासह लिंक केले पाहिजे. जर तुमचे पॅन कार्ड पीएफ खात्याशी लिंक नसेल तर पैसे काढताना तुम्हाला टीडीएस द्यावा लागेल. या अपडेटमुळे दावा रिजेक्ट होण्याची शक्यता कमी होते, त्यामुळे लवकर हे अपडेट करा.

आपली माहिती कशी निश्चित करावी?

यासाठी प्रथम ईपीएफओच्या अधिकृत संकेतस्थळावर जा. यानंतर यूएएन आणि पासवर्ड प्रविष्ट करा आणि लॉगिन करा. मुख्य पृष्ठावर ‘Manage> Modify Basic Details’ निवडा, जर आपला आधार व्हेरिफाईड केला असेल तर आपण तपशील एडिट करू शकत नाही. योग्य तपशील भरा (जे आपल्या आधार कार्डवर नोंदणीकृत आहे), त्यानंतर सिस्टम आधार डेटासह त्याची पडताळणी करेल. तपशील भरल्यानंतर, “Update Details” वर क्लिक करा, त्यानंतर माहिती कंपनीकडे मंजुरीसाठी पाठविली जाईल. (If these two details are correct then there is no problem in withdrawing money, check in advance)

इतर बातम्या

संतापजनक! 11 हजार रुपयांसाठी हॉस्पिटलने थेट मंगळसूत्रं घेतलं; बुलडाण्यातील धक्कादायक घटना

एका बेडसाठी 100 वेटिंगवर, रुग्णाच्या मृत्यूची सर्वांनाच प्रतिक्षा; यूपीच्या जिल्हाधिकाऱ्याने सांगितला दाहक अनुभव