नवी दिल्ली: नागरिकांची कोणत्याही ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करत असताना नियमित परतावा मिळावा, अशी भूमिका असते. यासाठी काही सरकारी योजना आहेत ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास नियमित परतावा मिळू शकतो. या योजनांमधून नियमितपणे उत्पन्न मिळते. सरकारी योजना असल्याने आपले पैसे सुरक्षित राहतात. या योजनांमध्ये पोस्टाच्या काही योजनांचा समावेश आहे. काही सरकारी योजनामंध्ये गुंतवणूक केल्यास दर तीन महिन्यांनी व्याज मिळते. (If you want money every month from Regular income Schemes you check here details)
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना ही भारतीय पोस्ट विभागातर्फे चालवली जाते. यामध्ये 5 वर्षापर्यंत गुंतवणूक करु शकता. या योजनेमध्ये ठेवलेल्या रकमेवर 6.6 टक्के व्याज मिळते. याशिवाय योजनेमध्ये दरमहा व्याज दिलं जाते. तुम्ही या योजनेमध्ये गुंतवणूक करणार असाल तर 1 हजार रुपयांपासून सुरुवात करता येते. या योजनेत गुंतवणूक करण्याची कमाल रक्कम 4.5 लाख रुपये आहे.
सिनिअर सिटीझन सेव्हिंग्ज स्कीम ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी असते. या योजनेत सुरुवातीला 5 वर्षांपर्यंत पैसे गुंतवता येतील. याची मुदत पुढील तीन वर्षांपर्यंत वाढवता येते. या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची मर्यादा 15 लाखांपर्यंत आहे. किमान गुंतवणूक करायची असल्यास 1 हजार रुपायांपासून करता येईल. सिनिअर सिटीझन सेव्हिंग्ज स्कीम योजनेमध्ये दर तीन महिन्यानंतर व्याज मिळते. तर, या योजनेचा व्याज दर 7.4 टक्के आहे.
प्रधानमंत्री व्यय वंदना योजनेअंतर्गत 7.4 टक्के व्याज दिले जाते. या योजनेमध्ये 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणारे नागरिक गुंतवणूक करु शकतात. या योजनेसाठी किमान 10 वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागते. ठराविक कालावधीनंतर या ठेवीवर कर्ज देखील काढता येते. या योजनेत गुंतवणू करणाऱ्या व्य्कतीला पेन्शन मिळते, हा त्यांना मिळणारा अतिरिक्त लाभ आहे.
सरकारी योजनांचे व्याज दर नियमितपणे बदलत असतात. त्यामुळे गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांनी योजनांच्या व्याज दराची माहिती संबंधित योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन खात्री करुन घ्यावी.
Ahmednagar lockdown : अहमदनगरमधील लॉकडाऊन 5 दिवसांनी वाढवला, आता कडक निर्बंध https://t.co/Oa8ioCcUXU #Maharashtra | #lockdown | #AhmednagarLockdown
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 11, 2021
संबंधित बातम्या:
PF चे पैसे आले! EPFO ने 8.50% व्याज केलं ट्रान्सफर, असा चेक करा तुमचा बॅलेंस
SBI, PNB आणि AXIS बँकेनं व्याजदर बदलले, जाणून घ्या कुठे मिळतो FD वर जास्त फायदा
(If you want money every month from Regular income Schemes you check here details)