FD मध्ये गुंतवणूक करायची असेल तर हे आहेत १० बेस्ट पर्याय,मिळेल ९ टक्क्यांपर्यंत परतावा

| Updated on: Nov 24, 2024 | 5:31 PM

एफडीवर व्याज मिळविण्याचा गुंतवणूकीचा पर्याय अनेक जण वापरत असतात. त्यामुळे चांगली गुंतवणूक आणि बचत होते. तुम्हाला देखील एफडी गुंतवणूक करुन बक्कळ व्याज मिळवायचे असेल तर या दहा बॅंकाचा चांगला पर्याय तुमच्याकडे आहे.

FD मध्ये गुंतवणूक करायची असेल तर हे आहेत १० बेस्ट पर्याय,मिळेल ९ टक्क्यांपर्यंत परतावा
Follow us on

फिक्स्ड डिपॉझिट ( FD ) मध्ये गुंतवणूक करुन बंपर नफा कमवायची योजना असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. सध्या देशात देशातील अनेक मोठ्या खाजगी आणि पब्लिक सेक्टर बॅंका एफडीवर चांगले व्याज देत आहेत. एफडीत गुंतवणूक केल्यानंतर ग्राहकांना एका निश्चित काळानंतर गॅरेंटेड इन्कम मिळते. इकॉनॉमिक टाईम्सच्या बातमीनुसार अनेक बॅंका आपल्या ग्राहकांना एफडीवर कमाल ८.७५ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. चला तर अशा दहा बॅंकांची माहिती पाहूयात..

ग्राहकांना ८.७५ टक्क्यांपर्यंत व्याज

एसबीएम बॅंक आपल्या सामान्य ग्राहकांना तीन वर्षे दोन दिवस पेक्षा जास्त आणि पाच वर्षांपेक्षा कमी असलेल्या एफडीवर ८.२५ टक्के आणि सिनिअर सिटीजन ग्राहकांना ८.७५ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. तर बंधन बॅंक सहाशे दिवसांच्या एफडीवर आपल्या सर्वसामान्य ग्राहकांना ८ टक्के आणि सिनिअर सिटीजनना ८.५० टक्के व्याज देत आहेत. दुसरीकडे डीसीबी बॅंक ३६ महिन्यांच्या एफडीवर सर्वसामान्य ग्राहकांना ८ टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना ८.५० टक्के व्याज ऑफर करीत आहे. त्याशिवाय डॉयचे बॅंक २ वर्षांहून अधिक आणि तीन वर्षांच्या एफडीवर सर्वसाधारण ग्राहकांना ७.७५ टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना तेवढेच व्याज देत आहेत.

यस बॅंक देतेय ८.२५ टक्के व्याज

दुसरीकडे यस बॅंक १८ महिने ते ३६ महिन्याच्या एफडीवर सर्वसामान्य ग्राहकांना ७.७५ टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना ८.२५ टक्के व्याज देत आहे.तर आरबीएल बॅंक २४ महिन्यापासून ३६ महिन्यापर्यंतच्या एफडीवर सर्वसामान्य ग्राहकांना ७.५० टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना ८ टक्के व्याज देत आहे. आयडीएफसी फर्स्ट बॅंक १ वर्षे १ दिवस ते ५५० दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्य ग्राहकांना ७.५० टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना ८ टक्के व्याज देत आहे.

हे सुद्धा वाचा

४४४ दिवसांच्या एफडीवर ८ टक्के व्याज

इंडसइंड बॅंक २ वर्षे ९ महिन्यापासून ते ३ वर्षे ३ महिन्यांपर्यंतच्या एफडीवर सर्वसामान्य ग्राहकांना ७.५० टक्के तर आपल्या ज्येष्ठ ग्राहकांना ८ टक्के व्याज देत आहे. तसेच एचएसबीसी बॅंक ७३२ ते ३६ महिन्यांच्या एफडीला सर्वसामान्य ग्राहकांना ७.५० टक्के व्याज आणि ज्येष्ठ ग्राहकांना ८ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. तर करुर वैश्य बॅंक ४४४ दिवसांच्या एफडीवर सर्वसामान्य ग्राहकांना ७.५० टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना ८ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे.