नवी दिल्ली | 21 ऑगस्ट 2023 : अमेरिकेत स्थायिक होणं हे अनेकाचं स्वप्नं असते. परंतू अमेरिकेत नोकरी मिळून चांगलं लाईफ जगण्याची संधी आली असताना मुंबईतून आयआयटी पास झालेल्या नितीन सलूजा याचं वेगळंच स्वप्न त्याला भारतात खेचून आलं. नितीन सलूजा याला भारतीयांना चहाबद्दल असलेल्या प्रेमानं चहाचा नवा ब्रॅंड काढण्याची कल्पना सुचली. यात नितीन याला त्याच्या मित्रानं देखील मदत केली. आज नितीनचा चहाचा चायोस ( Chaayos ) हा ब्रॅंड फेमस झाला आहे. देशभरात 200 चायोस कॅफे उघडण्यात आले आहेत.
नितीन सलोजा यांनी आयआयटीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर इतर तरूणांप्रमाणे अमेरिकेला नोकरीसाठी गेले. तेथील एका बड्या कंपनीत लाखो रुपयांच्या पगारावर काम करु लागले. परंतू तेथे त्यांचे मन लागले नाही. त्यांनी नंतर पुन्हा भारतात परतण्याचा निर्णय घेतला. नंतर त्यानी आपल्या स्टार्टअपद्वारे कोट्यवधीची कमाई केली. हा स्टार्टअप सुरु करताना अडचणी आल्या. परंतू धैर्य आणि दृढ संकल्पाने कोरोनाकाळातील अडचणींवर त्यांनी मात केली.
स्टारबक्स, कॅफे कॉफी डे, कॅफे मोचा आणि बरिस्ता असे देशात अनेक कॉफी शॉप्स असल्याने त्यांनी भारतीयांना चहाची आवड असल्याने चायोस हा नवा ब्रॅंड विकसित केला आहे. आता ही भारताची अग्रणी चहा विकणारी कॅफेची श्रृखंला तयार झाली आहे. नितीन सलूजा याची ही कंपनी शंभर कोटीचा व्यवसाय करणारी कंपनी बनली आहे. अमेरिकेत एका कंपनीत कॉरर्पोरेट मॅनेजमेंट कंन्सल्टेंट म्हणून काम करताना नितीन आणि त्यांच्या पत्नीला अमेरिकेत चहा विकणारे कोणी सापडले नाही. त्यामुळे चहाच्या ओढीने त्यांनी चहाचा विक्रीचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. नोकरी सोडून भारतात येऊन चहाचा बिझनेस सुरु केला.
भारतात चहा पिण्याची संस्कृती आहे. भारतात कॉफी सर्व्ह करणारे अनेक कॅफे असल्याने साल 2012 मध्ये नितीन आणि त्याचा मित्र राघव यांनी गुरुग्राममध्ये पहीला चायोस कॅफे उघडला. सुरुवातीला भांडवल जमविताना संघर्ष करावा लागला. कोरोनात चायोसला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. सुरुवातीला अडचणीचा सामना करावा लागल्यानंतर नितीनला मेहनतीचे फळ मिळाले. कंपनीने 2020 मध्ये 100 कोटी उत्पन्न मिळविले. आज भारतात 200 हून अधिक चायोस कॅफे आहेत. चायोस देशातील प्रिमियम चहा सर्व्ह करणारा कॅफे बनला आहे.