नवी दिल्ली : सरकारी संस्था, मार्केटिंग कंपन्या आदींच्या वतीने सामान्य लोकांच्या मोबाईल नंबरवर बल्क एसएमएस पाठविला जातो. यासंदर्भात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) कडक भूमिका घेत नियम कडक केले आहेत. या नियमांचे पालन न करणाऱ्या कंपन्यांची एसएमएस सेवा बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. असे असूनही जवळपास 40 कंपन्या निर्धारीत मानदंडांचे पालन करीत नाहीत. अशा परिस्थितीत ट्रायने अशा 40 डिफॉल्ट कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. या 40 संस्थांमध्ये 17 सरकारी आणि खासगी बँकांचा समावेश आहे. द लाईव्ह मिंटच्या अहवालानुसार या बँकांमध्ये स्टेट बँक (एसबीआय), अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय, एचडीएफसी बँक (एचडीएफसी), पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), कोटक महिंद्रा बँक, एलआयसी इत्यादींचा समावेश आहे. (Important news for customers of these banks including SBI, HDFC, PNB, this service may be closed from 1st April)
ईटीच्या अहवालानुसार, सरकारी आणि खासगी बँकांशिवाय फ्लिपकार्ट, नॅशनल स्टॉक एक्सचेंज याशिवाय नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांचादेखील या यादीमध्ये समावेश आहे. ट्रायने 31 मार्च पर्यंत सर्वांना मंजुरी दिली आहे. असे म्हटले जात आहे की 31 मार्च पर्यंत निर्धारीत मानदंडाचे पालन न केल्यास एसएमएस सेवा बंद केल्या जातील. जर असे झाले तर सर्वात मोठा फरक बँकांच्या ग्राहकांमध्ये पडेल. लाखो बँक ग्राहकांना आवश्यक सेवांशी संबंधित एसएमएस मिळणार नाहीत. व्यवहारासाठी आवश्यक असलेल्या ओटीपी सेवेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो.
याबाबत भूमिका कडक करताना ट्रायने म्हटले आहे की 31 मार्च 2021 पर्यंत सर्व घटकांना विहित मानके पाळावी लागतील. हे न केल्यास, त्यांचे ग्राहकांशी एसएमएस संभाषण 1 एप्रिल 2021 पासून बाधित होऊ शकते. ट्रायने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, टेली-मार्केटिंग कंपन्यांना नियामक मानदंड आणि अनिवार्यता पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला आहे. ग्राहकांना नियामक फायद्यांपासून वंचित ठेवू शकत नाही. 1 एप्रिलपासून नियामक आवश्यकतांचे पालन न करणारे संदेश थांबविले जातील, असा निर्णय घेण्यात आला आहे.
ट्रायच्या नियमांनुसार व्यावसायिक मजकूर संदेश पाठविणार्या संस्थांना टेलिकॉम ऑपरेटरकडे मॅसेज हेडर आणि टेम्पलेट नोंदणी करावी लागेल. या तमाम संस्थांना बँक, कंपन्या आणि इतर घटकांकडे जेव्हा एसएमएस आणि ओटीपी येईल, तेव्हा ब्लॉकचेन प्लॅटफॉर्मवर नोंदणीकृत टेम्पलेटमधून त्याची तपासणी केली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेस एसएमएस स्क्रबिंग असे म्हणतात.
ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारीत ट्रायच्या व्यावसायिक संदेशांचे नियमांचा उद्देश बँक फसवणूक, सायबर फ्रॉडवाल्या संदेशांना आळा घालण्यासाठी आहेत. ट्रायने स्क्रबिंग डेटा आणि दूरसंचार कंपन्यांनी सादर केलेल्या अहवालाचे विश्लेषण केले आहे. या संदर्भात, 25 मार्च रोजी टेलि मार्केटिंग कंपन्या / अॅग्रीगेटरसोबत एक महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. (Important news for customers of these banks including SBI, HDFC, PNB, this service may be closed from 1st April)
महागाईत आता विजेचा शॉक! 1 एप्रिलपासून कूलर-एसीची हवा महागणार, पैशाची बचत?#Electricityshock #biharelectricitypricehikehttps://t.co/TcCgYEU2lm
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 27, 2021
इतर बातम्या
होळीच्या पार्श्वभूमीवर तिरोडा पोलिसांचे 3 ठिकाणी छापे; 1 लाख 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त