येत्या काही दिवसांत क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर करणे अत्यंत सोयीचे आणि सुरक्षित होणार आहे. केंद्रीय रिझर्व्ह बँक ग्राहकांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यासाठी नियमांमध्ये पण बदल करण्यात येत आहे. आता रिझर्व्ह बँक आता अशी तयारी करत आहे की, त्यामुळे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डचा वापर पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होईल.
नियम कधी होणार लागू
आरबीआय अशी तयारी करत आहे की, पेमेंट ॲग्रीगेटर ग्राहकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डची कोणतीही माहिती जतन करु शकणार नाही. त्यांना ही माहिती न मिळताच व्यवहार सुलभतेवर केंद्रीय बँक काम करत आहे. त्यासाठी विशेष तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. त्यासाठी एक सर्क्युलर पण काढण्यात आले आहे. त्यानुसार, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डची माहिती जतन करण्यासंबंधीचा नियम 1 ऑगस्ट 2025 रोजीपासून लागू करण्यात येईल.
प्रस्तावित नियम सांगतो काय?
नवीन नियमानुसार, अशी व्यवस्था करण्यात येईल की, पेमेंट ॲग्रीगेटर कंपन्या ग्राहकांच्या डेबिट, क्रेडिट कार्डची सविस्तर माहिती जतन, सेव्ह करु शकणार नाहीत. नवीन ड्राफ्ट रुल्स अनुसार, पेमेंट ॲग्रीगेटर कंपन्या ग्राहकांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड्स ऑन फाईल, सीओएफचा डेट स्टोर करु शकणार नाही. त्यासाठीची कोणतीही मंजूरी मिळणार नाही. नियम लागू झाल्यावर ग्राहकाच्या कार्डविषयीची माहिती केवळ कार्ड देणारी संस्था आणि कार्ड नेटवर्क या दोघांनाच माहिती असेल.
या डेटा जतन करण्याची सवलत
क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड बँका ग्राहकांना देतात. तर कार्ड नेटवर्क पुरवठा करणारे व्हिसा, मास्टरकार्ड, डायनर्स क्लब, रुपे आदी मुख्य आहेत. याचा अर्थ 1 ऑगस्ट 2025 पासून नवीन नियम लागू झाल्यानंतर केवळ बँका, व्हिसा, मास्टरकार्ड, डायनर्स क्लब, रुपे या सारख्या कार्ड नेटवर्क प्रोव्हायडरच कार्ड्स ऑन फाईल डेटा त्यांच्याकडे ठेऊ शकतील.
नियमांना अंतिमस्वरुप नाही
आरबीआयने या नियमांना अद्याप अंतिम स्वरुप दिलेले नाही. या नियमांचा एक मसूदा तयार करण्यात आला आहे. आता या मुसदावर हरकती आणि सूचना मागविण्यात येतील. बँकिग, क्रेडिट-डेबिट कार्ड संबंधी सर्वांचे म्हणणे ऐकून घेण्यात येईल. त्यांच्या सूचना आणि हरकतींवर विचार करण्यात येईल. त्यानंतर नियमांना अंतिम स्वरुप देण्यात येईल. त्यानंतर याविषयीचा नियम लागू करण्यात येईल.