2023 मध्ये भारतीयांनी केला जागतिक रेकॉर्ड, दर दिवसाला 100 कोटींचा ऑनलाइन व्यवहार

| Updated on: Jan 02, 2024 | 10:58 PM

UPI पेमेंटसाठी 2023 हे वर्ष अनेक अर्थांनी खास ठरले. गेल्या वर्षी भारतीयांनी मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन पेमेंट केले. गेल्या एका वर्षात UPI पेमेंटच्या बाबतीत 42 टक्के वाढ नोंदवली गेली आहे.

2023 मध्ये भारतीयांनी केला जागतिक रेकॉर्ड, दर दिवसाला 100 कोटींचा ऑनलाइन व्यवहार
UPI PAYMENTS
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

नवी दिल्ली | 2 जानेवारी 2024 : 2023 मध्ये भारतीयांनी अनेक विक्रम मोडले आहेत. हे वर्ष ऑनलाइन पेमेंटसाठी अनेक बाबतीत खास ठरले. 2023 मध्ये UPI पेमेंटमध्ये 42% ची वाढ नोंदवण्यात आली आहे. एकूण 18 लाख कोटी रुपयांचे ऑनलाइन व्यवहार झाले आहेत. व्यवहार मूल्यामध्येही 54% ची वाढ नोंदवली गेली आहे. ऑनलाइन व्यवहारांमध्ये दर महिन्याला वाढच होत राहिली. डिसेंबर महिन्यामध्ये दैनिक UPI पेमेंट 40 कोटी रुपये होते. तर, फास्ट टॅग पेमेंट हे 34.8 कोटी रुपये होते. गेल्या एका वर्षात 13% ची वाढ नोंदवली गेली.

UPI पेमेंटसाठी 2023 हे वर्ष अनेक अर्थांनी खास ठरले. गेल्या वर्षी भारतीयांनी मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन पेमेंट केले. गेल्या एका वर्षात UPI पेमेंटच्या बाबतीत 42 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. आकडेवारीमध्ये सांगायचे झाल्यास संपूर्ण वर्षात एकूण 18 लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत.

एका वर्षात व्यवहार मूल्यामध्ये 54 टक्के इतकी वाढ नोंदवण्यात आली आहे. हा आकडा वाढून 1,202 कोटी रुपये झाला आहे. तसेच, ऑनलाइन पेमेंटच्या बाबतीत महिनागणिक वाढ नोंदवली गेली आहे.

दररोज 100 कोटी रुपयांचे ऑनलाइन व्यवहार

2023 या वर्षाच्या सुरुवातीच्या NPCI च्या डेटावर नजर टाकली तर अंदाजे 100 कोटी दैनंदिन ऑनलाइन व्यवहार झाल्याचे दिसून आले. डिसेंबरमध्ये दैनंदिन UPI ​​पेमेंट 40 कोटींवर पोहोचले. तसेच, डिसेंबरमध्ये 34.8 कोटी फास्ट टॅग पेमेंट करण्यात आले, ही वाढ गेल्या एका वर्षाच्या तुलनेत 13 टक्के इतकी वाढली आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये 5,539 कोटी रुपयांच्या तुलनेत हा आकडा 10 टक्क्यांनी वाढला हे विशेष.

ऑनलाइन पेमेंट आता पूर्वीपेक्षा सोपे होणार

डिसेंबरमध्ये, विशेषत: ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये भारतीयांनी फास्ट टॅगमध्ये वाढ झाली. सुट्टीचा अनानाद घेताना लोकांनी भरपूर वाहने कॅह्विली त्यामुळे या रकमेत वाढ झाली. हा एक विक्रम झाला आहे. त्याचप्रमाणे गेल्या वर्षांत भारतात स्मार्टफोनच्या वापरासोबतच ऑनलाइन पेमेंटचे प्रमाणही वाढले आहे. कोणत्याही छोट्या छोट्या वस्तू खरेदी करताना ऑनलाइन पेमेंट करण्यात येत असल्याने ही वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.