Inflation In India | गुडन्यूज! महागाईचा तोरा उतरला, आकड्यांचा दावा काय

| Updated on: Oct 20, 2023 | 9:14 AM

Inflation In India | महागाईच्या मोर्चावर केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. जुलै महिन्याने सर्वसामान्यांचा नाही तर केंद्र सरकारचा पण घामाटा काढला होता. टोमॅटोसह इतर भाज्यांनी कहर केला होता. हस्तक्षेपानंतर भाज्यांचे दर आटोक्यात आले. गॅस सिलेंडर थोडा स्वस्त झाला, त्याचे परिणाम आता दिसत आहे.

Inflation In India | गुडन्यूज! महागाईचा तोरा उतरला, आकड्यांचा दावा काय
Follow us on

नवी दिल्ली | 20 ऑक्टोबर 2023 : महागाईच्या आघाडीवर आनंदवार्ता आली आहे. महागाई कमी झाली आहे. जुलै महिन्यात महागाईने कळस गाठला होता. टोमॅटोच्या किंमती वाढल्या होत्या. इतर भाजीपाल्याने सुद्धा डोके वर काढले होते. गेल्या अनेक वर्षातील रेकॉर्ड तुटले होते. केंद्र सरकारने वेळीच हस्तक्षेप केल्याने हे दर खाली आले. गेल्या महिन्यात गॅस सिलेंडरमध्ये थोडी कपात करण्यात आली. त्यामुळे घरचे बजेट आटोक्यात आले. सर्वसामान्यांचे जीवन थोडेफार सुकर झाले. महागाई कमी होण्यासाठी या काही निर्णयाचा हातभार लागला. त्याचा परिणाम लागलीच दिसला. सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाई आटोक्यात आली आहे. ठोक महागाईत पण बरीच तफावत दिसत आहे.

रिझर्व्ह बँकेचा दावा काय

रिझर्व्ह बँकेने गुरुवारी महागाईविषयी एक ताजा लेख लिहिला आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक परिस्थितीचा आणि महागाईचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार, तिसऱ्या तिमाहीत भारताच्या जागतिक वृद्धीदरावर परिणाम झाला. त्यात नरमाई आली. पण महागाई कमी झाल्याने आर्थिक स्थिती सुधारल्याचे चित्र आहे. महागाई आटोक्यात आल्यास आर्थिक वृद्धी दर सुधारेल.

हे सुद्धा वाचा

महागाईचा दर झाला कमी

सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर कमी झाला. हा दर 5.02 टक्क्यांवर आला. या वर्षी एप्रिल महिन्यानंतर महागाईने डोके वर काढले होते. जुलै महिन्यात तर महागाई सर्वसामान्यांच्या डोक्यावर नाचली. केंद्र सरकार खडबडून जागे. उपाययोजना करण्यात आल्या. त्याचा परिणाम सप्टेंबर महिन्यात दिसून आला. सप्टेंबर महिन्यात महागाई आटोक्यात आल्याचे समोर आले. रिझर्व्ह बँकेने किरकोळ महागाईसाठी 6 टक्के उच्चांक तर दोन टक्के निच्चांकी मर्यादा घालून दिलेली आहे.

महागाईचे तांडव

जुलै 2023 मध्ये महागाईचा दर 7.44 टक्क्यांवर पोहचला. किरकोळ मूल्य निर्देशांक, CPI आधारीत महागाई ऑगस्ट 2023 महिन्यात 6.83 टक्के होती. तर गेल्यावर्षी, सप्टेंबर 2022 मध्ये किरकोळ महागाईचा दर 7.41 टक्के होता. महागाई निर्देशांकानुसार रिझर्व्ह बँक रेपो दर निश्चित करते.

रेपो दर होईल का कमी

अजून काही महिने महागाई जर आटोक्यात आली तर त्याचा मोठा फरक सर्वच क्षेत्रात दिसेल. डिझेलच्या किंमतीत मोठी कपात झाल्यास माल वाहतूक स्वस्त होईल. त्याचा परिणाम लागलीच बाजारपेठेत दिसू शकतो. काही वस्तूंवरील जीएसटी कमी झाल्यास स्वस्ताई येऊ शकते. या सर्व घडामोडींचा परिणाम लागलीच रेपो दरावर दिसू शकतो. सध्या चारवेळा रेपो दरात कुठलाही बदल झालेला नाही.