नवी दिल्ली : भारतीय सराफा बाजारात आज, 2 मार्च 2023 रोजी सोने आणि चांदीच्या भावात (Gold Silver Price) घसरण दिसून आली. सोन्याच्या किंमती 56 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपेक्षा अधिक आहे. तर चांदीचा भाव 63 हजार रुपये प्रति किलोपेक्षा अधिक आहे. राष्ट्रीय स्तरावर 999 शुद्ध 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,066 रुपये आहे. तर 999 शुद्ध चांदीचा भाव 63,911 रुपये प्रति किलो आहे. इंडिया बुलियन ॲंड ज्वेलर्स असोसिएशननुसार (India Bullion And Jewellers Association) बुधवारी संध्याकाळी 24 कॅरेट शुद्ध सोने 56,140 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. हा भाव गुरुवारी सकाळी 56,066 रुपये होता. शुद्धतेनुसार सोने-चांदीच्या किंमतीत तफावत दिसून येते.
ibjarates.com या अधिकृत संकेतस्थळानुसार, आज सकाळी 995 शुद्ध 10 ग्रॅम सोन्याचा भाव घसरला. हा दर 55,842 रुपयांपर्यंत खाली आला. तर 916 शुद्ध सोने आज 51,356 रुपयांवर पोहचले. शुद्ध सोन्यासह चांदीच्या किंमतीत घसरण दिसून आली. 750 शुद्ध सोन्याच भाव 42,049 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. 585 शुद्ध सोने घसरले. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 32,798 रुपयांवर पोहचली. तर 999 शुद्ध एक किलो चांदीची किंमत 64,407 रुपये झाली.
सोन्याने 2 फेब्रुवारी रोजी उच्चांक गाठला होता. त्यापेक्षा सध्या 3300 रुपये प्रति 10 ग्रॅम भाव उतरले आहेत. 2 फेब्रुवारी रोजी सोन्याने 58,470-58882 रुपये या दरम्यान होता. चांदीने 79980 रुपये प्रति किलो असा उच्चांक गाठला होता. त्यापेक्षा सध्या चांदी 16973 रुपये प्रति किलो स्वस्त मिळत आहे.
गुडरिटर्न्सनुसार,मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,750 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,450 रुपये आहे. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,750 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,450 रुपये आहे. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,750 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,450 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 51,780 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 56,480 रुपये आहे.
भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.
काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.