लोकसभेत राहुल गांधी यांनी केलेल्या आक्रमक भाषणात अग्निवीर योजनेवर निशाणा साधला होता. मोदी सरकारने गेल्या कार्यकाळात वर्ष 2022 मध्ये अग्निपथ योजना सुरु केली होती. या योजनेत हजारो तरुणांना नोकरी मिळाली आहे. पण अग्निवीर हा नोकरी इतर जॉबपेक्षा थोडी वेगळी आहे. आयकर भरण्यासाठी पण त्यांच्यासाठी वेगळी वाट आहे. त्यामुळे या योजनेतील तरुणांनी आयटीआर भरताना सावध असणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने कायद्यात तरतूद केली आहे. एक चुकीमुळे आयकर नोटीस येऊ शकते.
अग्निवीरमध्ये 4 वर्षांची कालमर्यादा
अग्निवीर योजनेत केवळ 4 वर्षांची कालमर्यादा आहे. या कालावधीत वेतनातून होणाऱ्या कमाईचा खुलासा आयटीआर फॉर्ममध्ये करावा लागतो. त्यासाठी आयटीआर फॉर्म 1 मध्ये बदल करण्यात आलेला आहे. जर आयटीआर भरताना या गोष्टीची काळजी घेतली नाही तर हमखास आयकर खात्याची नोटीस येऊ शकते.
काय झाला बदल
प्राप्तिकर खात्याने वित्त अधिनियम 2023 मध्ये नवीन कलम 80CCH जोडले आहे. या कलमातंर्गत अग्निवीर योजनामध्ये सहभागी तरुणांना कर बचतीची संधी मिळते. आयटीआर भरताना तरुणांनी आयटीआर फॉर्मची निवड करणे आवश्यक आहे. यामध्ये कलम 80CCH अंतर्गत देण्यात आलेल्या रकान्यात (कॉलम) त्यांच्या उत्पन्नाची माहिती भरावी लागणार आहे.
कोणाला होणार फायदा
अग्निपथ योजनातंर्गत केंद्र सरकारने प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी एक सेवानिधी तयार करण्यास सांगितले आहे. या योजनेतंर्गत चार वर्षांची नोकरीची तरतूद आहे. त्यांच्या वेतनातील 30 टक्के रक्कम सेवानिधी अंतर्गत जमा होतो तर केंद्र सरकार तितक्याच रक्कमेची तरतूद करते. चार वर्षांनतर जवळपास 10 लाख रुपये जमा होतात. ही रक्कम पूर्णतः करमुक्त आहे. त्यावर व्याज पण मिळते.
कोणत्या कर प्रणालीत सूट?
अग्निवीर कॉर्पसमध्ये जमा झालेल्या रक्कमेवर आयकर सवलत मिळवायची असेल तर जुन्या कर प्रणालीत त्याचा फायदा घेता येतो. यामध्ये अग्निवीराने जमा केलेल्या रक्कमेसोबतच केंद्र सरकारने जमा केलेल्या रक्कमेचा पण सहभाग आहे. यामध्ये जुन्यासह नवीन कर प्रणालीत सवलतीचा फायदा घेता येऊ शकतो.