नवी दिल्ली | 22 सप्टेंबर 2023 : देशात अंडरवेअर तयार करणाऱ्या कंपन्यांच्या विक्रीत मोठी घसरण झाल्याची बातमी गेल्या आठवड्यात येऊन धडकली होती. अनेक कंपन्यांची विक्री घसरली आहे. कंपन्या या घसरणीने चिंतेत असतानाच आता अंडरवेअर उत्पादन करणाऱ्या या कंपनीवर प्राप्तीकर खात्याने छापा (IT Raid On Underwear Company) टाकला आहे. कंपनीच्या विविध ठिकाणच्या कार्यालयावर धाडसत्र सुरु होते. कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या घरावर सुद्धा छापा पडला. या दरम्यान कसून चौकशी करण्यात आली. या धाडसत्राची माहिती मिळताच शेअर बाजारात शेअर घसरला. कंपनीचा शेअर 4.55 टक्क्यांनी घसरला. या धाडीविषयी कंपनीने कोणतीही आधिकृत माहिती दिली नाही.
कंपनीवर काय आरोप
200 कोटी रुपयांचा कर चोरी केल्याप्रकरणात प्राप्तिकर खात्याने लक्स इंडस्ट्रीज (Lux Industries) कंपनीच्या कार्यालयावर छापे टाकले. देशभरात ही कारवाई झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयकर विभागाने कोलकत्तासह इतर अनेक शहरात कंपनीच्या कार्यालयावर धाड घातली. तसेच कंपनीच्या इतर ठिकाणी पण चौकशी सुरु आहे. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरावर पण छापा टाकण्यात आला.
Income Tax Department is conducting raids on Lux Industries over allegations of tax evasion of more than Rs 200 crores. Search is underway in multiple cities at premises linked to the company including Kolkata. Offices and residences of top officials are covered in the raids:…
— ANI (@ANI) September 22, 2023
कंपनीचा शेअर घसरला
कंपनीच्या कार्यालयावर धाड पडल्याचे वृत्त शेअर बाजारात येऊन धडकले. त्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये घसरण आली. कंपनीचा शेअर 4.55 टक्क्यांनी घसरला. कंपनीचा शेअर 1451 रुपयांपर्यंत घसरला. BSE आकड्यानुसार लक्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये 3.32 टक्के घसरण झाली. 1469.70 रुपयांवर हा शेअर ट्रेड करत होता. कंपनीचा शेअर सकाळच्या सत्रात 1510 रुपयांवर उघडला. तर एक दिवसापूर्वी हा शेअर
1520.20 रुपयांवर बंद झाला होता.
या कंपनीवर पण धाडसत्र
कानपूर येथे शूज तयार करणाऱ्या युरो फुटवेअर कंपनीवर पण धाड पडली. आयकर विभागाच्या टीमने येथे छापा टाकला. युरो फुटवेअर ही बुट तयार करणारी कंपनी आहे. ही कंपनी फुटवेअरमधील आघाडीची कंपनी आहे. ही कंपनी पादत्राणे निर्यात करते. देशातील अनेक ठिकाणी कंपनीचे ऑफिस आणि फॅक्टरी आहेत. दुपारी 2 वाजता आयकर विभागाने कंपनीच्या कार्यालयावर अचानक धाड टाकली. यावेळी पोलीस बंदोबस्त होता. कंपनीच्या इतर ठिकाणी पण धाडसत्र राबविण्यात आले. याविषयीची अधिकृत माहिती कंपनीने दिलेली नाही.