नवी दिल्ली: तुम्ही नोकरदार असाल तर केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या कर रचनेनुसार तुम्हाला आयकर (Income Tax) भरावा लागतो. मात्र, विशिष्ट खर्चांवर तुम्हाला यामधून सूट मिळू शकते. एरवी नोकरदार वर्गासाठी वेगवेगळे कर हा पाचवीला पुजलेला विषय असतो. मात्र, बारकाईने विचार केल्यास नोकरदारांना विशिष्ट पद्धतीने खर्च करून यामधूनही पैशांची बचत करता येऊ शकते. कोणते खर्च केल्यास मिळते आयकरातून सूट मिळते, याचा आढावा खालीलप्रमाणे. (know investments for Tax exemptions to save income Tax)
तुम्ही विवाहित असून तुम्हाला मुलं असतील तर त्यांच्या शिक्षणासाठी खर्च झाल्यास तुम्हाला आयकरातून सूट मिळते. कलम 80 सी अंतर्गत ही सूट दिली जाते.
भविष्य निर्वाह निधी अर्थात प्रोव्हिडंट फंड हा नोकरदार वर्गाच्या विशेष जिव्हाळ्याचा विषय असतो. नोकरदारांच्या वेतनातून PF साठी जी रक्कम कापली जाते त्यावरही कलम 80 सी अंतर्गत सूट मिळते. यामध्ये तुमच्या EPF आणि PPF खात्याचाही समावेश असतो. याशिवाय, सुकन्या समृद्धी योजना, एनएससी, टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड आणि विशिष्ट मुदत ठेवींमध्ये (Fixed Deposit) गुंतवणूक केल्यास आयकरातून सूट मिळते.
नोकरदार व्यक्तीने स्वत:च्या कुटुंबाचा विमा उतरवला असेल तर तुम्हाला त्यासाठी आयकरातून सूट मिळते. यामध्ये आरोग्य विम्यापासून ते बच योजनांचा समावेश आहे. जीवन विम्याच्या प्रिमियमसह इतर अनेक पर्यायांचा विचार करता 1.5 लाखापर्यंतच्या गुंतवणुकीवर आयकर माफ असतो.
तुम्ही गृहकर्जाचे हप्ते भरता असाल तर त्यावर तुम्हाला आयकर माफ केला जातो. अशावेळी तुम्हाला होम लोन, एसएसवाय, एनएससी, एससीएससीसी योजनांच्या खर्चासाठीही आयकरातून सूट मिळते.
भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांनाही आयकरातून सूट मिळते. जर वर्षाला तुम्ही एक लाखाहून अधिक भाडं भरत असाल तर तुम्हाला त्याची पावती सादर करावी लागते. त्याबरोबर घरमालकाचे पॅनकार्ड देणेही बंधनकारक आहे.
आयकर वाचवण्यासाठी सेक्शन 80 सी अंतर्गत गुंतवणूक करण्याचा मार्ग सर्रासपणे वापरला जातो. या पर्यायाचा वापर केल्यास एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आयकरातून सूट मिळते.
संबंधित बातम्या:
खाते उघडण्याच्या नियमात RBI कडून बदल; ग्राहकांना होणार मोठा फायदा
New Year ला लागू होणार चेक आणि डेबिट-क्रेडिट कार्डचे नियम, RBI ने केली मोठी घोषणा
लग्न करणाऱ्यांना सरकार देत आहे सोनं, लग्नाच्या आधी असं करा अप्लाय
(know investments for Tax exemptions to save income Tax)