ITR जमा केला, आता रिफंडची प्रतिक्षा, जाणून घ्या काय आहे अपडेट, असे तपासा स्टेटस

| Updated on: Aug 04, 2024 | 2:45 PM

Income Tax Refunds 2024 : आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत संपली आहे. कोट्यवधी गुंतवणूकदारांनी अगोदरच आयटीआर दाखल केला आहे. आता त्यांना टॅक्स रिफंडची प्रतिक्षा आहे. रिफंडचे स्टेट्‍स तुम्ही चेक केले का?

ITR जमा केला, आता रिफंडची प्रतिक्षा, जाणून घ्या काय आहे अपडेट, असे तपासा स्टेटस
आयकर रिफंड
Follow us on

आर्थिक वर्ष 2023-24 (मूल्यांकन वर्ष 2024-25) साठी आयकर रिटर्न (ITR) दाखल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै, 2024 रोजी होती. देशातील 7 कोटींहून अधिक करदात्यांनी या मुदतीपूर्वी आयकर रिटर्न दाखल केला. आता देशातील करदात्यांना टॅक्स रिफंडची प्रतिक्षा लागली आहे. एक्सेस टॅक्स डिडक्शन म्हणजे टीडीएसमुळे आयकर टॅक्स रिफंड मिळतो.

तर करा रिफंड क्लेम

ज्या करदात्यांना संपूर्ण आर्थिक वर्षात कराच्या माध्यमातून जास्त रक्कम अदा केली असेल, त्यांना आयटीआर दाखल केल्यानंतर रिफंड क्लेम करता येतो. आयकर रिटर्न प्रक्रिया दरम्यान ही रिफंड क्लेमची रक्कम थेट संबंधित खात्यात जमा करण्यात येते. यंदा अनेक करदात्यांनी अजून त्यांना रिफंड मिळाला नसल्याचा तक्रारीचा सूर आळवला आहे.

हे सुद्धा वाचा

एकदा आयटीआर दाखल केल्यानंतर आयकर विभाग साधारणपणे काही आठवड्यातच रिफंडची प्रक्रिया सुरु करतो. ऑटोमेशन आणि डेटा विश्लेषणामुळे ही प्रक्रिया अजून सोपी झाली आहे. या प्रक्रियेला गती आली आहे. पण काही किरकोळ चुकांमुळे ही प्रक्रिया लांबली आहे.

असे तपासा आयटीआर रिफंड स्टेट्स

सर्वात अगोदर आयकर खात्याच्या ई-फायलिंग पोर्टल http://www.incometax.gov.in वर जा. याठिकाणी लॉगिन करा. पॅनकार्डचा त्यासाठी वापर करण्यात येतो. जर तुम्ही नाव नोंदणी केली नसेल तर अगोदर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. लॉगिन केल्यानंतर होमपेजवर माय अकाऊंट हा पर्याय निवडा. ड्रॉप डाऊन मेन्यूमधून ‘रिफंड/डिमांड स्टेटस स्थिती’ हा पर्याय निवडा. त्यावर क्लिक करताच रिफंड स्टेट्‍ससाठी संबंधित पेज उघडेल.

या पेजवर आता तुमच्या मूल्यांकन वर्षाची माहिती मिळेल. त्यानंतर रिफंड कसा देण्यात येईल, याची माहिती देण्यात येईल. तुम्ही जी रिफंड रिक्वेस्ट टाकली आहे, त्याचा रेफ्रेंस नंबर मिळेल. याठिकाणी स्टेट्‍सची माहिती मिळेल.

आयकर अधिनियमात लवकरच बदल

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेट भाषणात आयकर अधिनियम 1961 मध्ये बदल करण्याचा निर्णय जाहीर केला. 23 जुलै रोजी अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी यामध्ये सुधारणा करण्याचा निश्चिय जाहीर केला. ही प्रक्रिया येत्या 6 महिन्यात पूर्ण करण्याचे त्यांनी जाहीर केले. आयकर अधिनियमात बदल करण्याचे काम मोठे आहे. हा कायदाच 1600 पानांचा असल्याने हा कायदा संशोधीत करणे, त्यात बदल करणे हे मोठे आव्हान आहे.