Income Tax Return : या लोकांना नाही आयकर रिटर्न भरण्याची गरज, काय आहे नियम

| Updated on: Jan 21, 2023 | 9:18 PM

Income Tax Return : या भारतीय नागरिकांना प्राप्तिकर रिटर्न भरण्याची आवश्यकता नाही, कोण आहेत हे लोक ?

Income Tax Return : या लोकांना नाही आयकर रिटर्न भरण्याची गरज, काय आहे नियम
Follow us on

नवी दिल्ली : प्राप्तिकर रिटर्न (Income Tax Return) फाईल करण्यासाठी निश्चित कालावधी असतो. आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख (ITR Filing Last Date) निश्चित असते. या तारखेनंतर करदात्यांना वाढीव मुदत देण्यात येते. ही वाढीव मुदत अर्थातच सशुल्क असते. पण योग्य माहिती अभावी अनेकजण या काळातही कर भरत नाहीत आणि मग त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होते. काही प्रकरणात शिक्षेची पण तरतूद आहे. त्यामुळे तुमची कमाई करपात्र असेल तर तुम्हाला प्राप्तिकर रिटर्न भरणे आवश्यक आहे.

आयटीआर रिटर्न हा एक अर्ज असतो. त्याचा उपयोग कर देण्यासाठी करण्यात येतो. भारतीय प्राप्तिकर खाते तुमची कमाई, संपत्तीवर काही ठराविक कर आकारण्यात येतो, आयटीआर हा इलेक्ट्रॉनिक मोडच्या माध्यमातून जमा करण्यात येतो. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्यक्षस्वरुपात कर जमा करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.

करपात्र व्यक्ती, कृत्रिम न्यायिक व्यक्ती, एखादी फर्म, सार्वजनिक न्यास, ट्रस्ट, कंपनी अथवा समाजाचा एक घटक करदात असतो. आयकर भरताना व्यक्तीला कोणतेही कागदपत्र जोडावे लागत नाही. केवळ एक फॉर्म जमा करावा लागतो.

हे सुद्धा वाचा

करदाता ITR ला आधार कार्डच्या मोबाईल क्रमांक अथवा इंटरनेट बँकिंगचा वापर करुन जमा करतो. त्यासाठी OTP द्वारे ई-सत्यापन करतो. त्यानंतर आयटीआर अर्ज जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण होते. करदात्यांसाठी काही श्रेणी तयार करण्यात आली. त्यानुसार सर्व करदात्यांना निश्चित कालावधीत कर जमा करावा लागतो.

परंतु, काही लोकांना कर देण्याची बिलकूल आवश्यकता नसते. ज्या व्यक्तींचे वय 60 वर्षांहून कमी आहे. त्यांची वार्षिक कमाई 2.5 लाख रुपये आहे. त्यांना बिलकूल कर देण्याची गरज नाही. मात्र, या मर्यादेपक्षा अधिकचे उत्पन्न असणाऱ्या व्यक्तीला आयटीआर अर्ज जमा करावा लागतो.

एखाद्या व्यक्तीचे वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे आणि 80 वर्षांपेक्षा कमी आहे. तसेच त्यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये आहे. तरीही त्या व्यक्तीला कराच्या परीघात ठेवण्यात येते. त्यांना कर भरावा लागतो.

तर एखाद्या व्यक्तीचे वय 80 वर्षांपेक्षा अधिक आहे आणि त्याची वार्षिक कमाई 5 लाख रुपये आहे. त्या व्यक्तीला कर भरण्याची गरज नाही. पण उत्पन्न मर्यादा अधिक असल्यास मात्र या नियमाला अपवाद आहे.

यापूर्वी तुम्ही नियमीतपणे आयटीआर फाईल करत असाल तर तुम्हाला कर्ज घेताना अडचण येत नाही. व्हिसा घेताना आयटीआरची मदत घेता येते. ज्यावेळी तुम्ही व्हिसासाठी अर्ज करता, तर दुतावास तुम्हाला आयटीआर हिस्ट्री सबमिट करण्यास सांगते.