आयकरदात्यांसाठी नवीन वर्षात आनंदवार्ता, रिटर्न दाखल करण्याची मुदत वाढली

| Updated on: Jan 01, 2025 | 2:43 PM

Income Tax Return File Date Extended : मूल्यांकन वर्ष 2024-25 (आर्थिक वर्ष 2023-24) साठी रिव्हाईज्ड रिटर्न फाईल करण्यासाठीची अंतिम मुदत 31 डिसेंबर होती. आता ही तारीख वाढवण्यात आली आहे. 5000 रुपयांपर्यंतचा दंड वाचवण्यासाठी करदात्यांना मोठी संधी मिळाली आहे.

आयकरदात्यांसाठी नवीन वर्षात आनंदवार्ता, रिटर्न दाखल करण्याची मुदत वाढली
आयकर रिटर्न भरण्याची अंतिम मुदत वाढली
Follow us on

देशातील लाखो करदात्यांसाठी आनंदवार्ता आली आहे. ज्यांनी 31 डिसेंबरपर्यंत रिव्हाईज्ड आयटीआर वा बिलेटेड आयटीआर फाईल केला नाही. त्यांना आता दिलासा मिळाला आहे. आयकरदात्यांना आता 15 जानेवारीपर्यंत आयटीआर फाईल करण्याची संधी मिळाली आहे. मूल्यांकन वर्ष 2024-25 (आर्थिक वर्ष 2023-24) साठी रिव्हाईज्ड रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत पूर्वी 31 डिसेंबर ही होती. आयकर खात्याने एक्सवर याविषयीची एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानुसार केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने मूल्यांकन वर्ष 2024-25 साठी उशीरा, विलंबाने आयकर रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2024 हून आता 15 जानेवारी 2025 अशी केली आहे.

किती आहे दंड?

विलंबाने रिटर्न दाखल करण्यासाठी किती शुल्क आकारले जाते हे त्याच्या वार्षिक उत्पन्नावर अवलंबून आहे. जर तुमचे वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांहून अधिक असेल तर सुधारीत वा विलंबाने रिटर्न दाखल करण्यासाठी सरकार 5,000 रुपयांचा दंड आकारते. जर वार्षिक उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर प्राप्तिकर खाते सुधारीत वा विलंबाने रिटर्न दाखल करण्यासाठी 1,000 रुपयांचा दंड वसूल करते. तर करदात्यांना थकीत कराच्या रक्कमेवर दंडात्मक व्याज द्यावे लागते. 31 जुलैनंतर आयटीआर नियमानुसार, प्रति महिना 1 टक्क्यांचे दंडात्मक व्याज आकारले जाते.

हे सुद्धा वाचा

जुन्या कर व्यवस्थेतंर्गत करदात्यांसाठी एक मोठे नुकसान असे आहे की, आता त्यांना जुन्या कर प्रणालीतंर्गत सर्व कपात आणि सवलती सोडून नवीन कर प्रणालीअंतर्गत आयटीआर दाखल करावा लागेल. जेव्हा तुम्ही निश्चित तारखेपूर्वी आयटीआर फाईल करता, तेव्हा तुम्हाला 1 एप्रिलपासून रिफंडच्या तारखेपर्यंत परतावा रक्कमेवर 0.5 टक्क्यांनी प्रति महिना दराने देण्यात येते. उशीरा आयटीआर दाखल केल्याच्या प्रकरणात व्याज रक्कमेची मोजणी आयटीआर दाखल करण्याच्या तारखेपासून रिफंड तारखेपर्यंत देण्यात येते.

बिलेटेड आयटीआर असे फाईल करा

ई-फायलिंग पोर्टलवर तुमच्या खात्यात लॉग इन करा. त्यानंतर ‘ई-फाईल’ वर क्लिक करा. आयकर रिटर्न निवडा आणि इनकम टॅक्स रिटर्न फाईल करा. मूल्यांकन वर्ष 2024-25 निवडा. ऑनलाईन पद्धत निवडा. नवीन फाईलिंग सुरू करा, यावर क्लिक करा. त्यानंतर आयटीआर फॉर्मची निवड करा. वैयक्तिक माहिती हे बटण दाबा. आता तुमची माहिती योग्य आहे की नाही ते तपासा. आता फाईलिंग विभागात जा. 139(4) निवडा. त्यात इतर आवश्यक माहिती भरा.