नवी दिल्ली : सध्या नोकरदार, पगारदार, करदात्यांना 5 लाख रुपयांपर्यंत प्राप्तिकर सवलत (Income Tax Saving) मिळते. पण त्यापेक्षा जास्त कमाई असेल तर त्यावर कर द्यावा लागतो. कर प्रणालीतील रचनेनुसार (Tax Slab) तुम्हाला कर द्यावा लागेल. कर रचनेनुसार कर द्यावा लागेल. पण तुम्ही ठरवलं तर 5 लाखच नाही तर 10 लाखांपेक्षा अधिक उत्पन्नावरही कर वाचविता येतो. अशा अनेक योजना आहेत की, तुम्हाला त्यात गुंतवणूक केल्याचा फायदा मिळतो. तुम्हाला कर फायदा मिळतो. 10 लाखांपेक्षा जास्त कमाई असेल तरी कर बचत करता येते.आयकर नियमानुसार (Income Tax Rule), सध्या वार्षिक 2.5 लाख रुपयांपर्यंतच्या कमाईवर कोणताही कर द्यावा लागत नाही. 2.5 ते 5 लाख रुपायंच्या कमाईवर 5% कर द्यावा लागतो. 5 ते 10 लाख कमाईवर 20% तर 10 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30% कर द्यावा लागतो.
समजा तुमचे उत्पन्न 10,50,000 रुपये आहे. त्यात प्रमाणित वजावट (Standard Deduction) 50,000 रुपये कमी होईल. स्टॅडर्ड डिडक्शनवर उरलेल्या रक्कमेवर गणना होते. त्यानंतरच्या कमाईवर कर गणना होते. केंद्र सरकारकडून नोकरदार कर्मचारी आणि निवृत्तीधारकाला 50,000 रुपयांपर्यंत प्रमाणित वजावटीचा फायदा मिळतो. 50,000 रुपये कमी झाल्याने तुमची कमाई 10,00,000 रुपयांच्या परिघात येईल.
याशिवाय केंद्र सरकार 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत सवलत मिळते. तुम्ही EPF, PPF, ELSS, NSC सारख्या योजनेतील गुंतवणुकीवर 1.5 लाख रुपयांपर्यंत कर वाचविता येतो. 10,00,000 रुपयांमधून 1.5 लाख रुपये कमी होतील. हे उत्पन्न 8,50,000 रुपये होईल.
तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी आरोग्य विमा योजना घेतली असल्यास 25,000 रुपयांपर्यत कर वाचविता येतो. नियम 80D अंतर्गत 25,000 रुपयांपर्यंत कर सवलत मिळते. आई-वडिलांसाठी आरोग्य विमा योजनेत 50,000 रुपयांपर्यंत डिडक्शन क्लेम करता येतो.
या दोन्ही प्रक्रियेत तुम्हाला 75,000 रुपयांची बचत करता येते. आता 8,50,000 मधून 75,000 कमी झाले. तुमचे उत्पन्न 7, 75,000 रुपये इतक राहिले. तुमच्या डोक्यावर गृहकर्जाचे ओझे असेल अथवा एखादी मालमत्ता तुम्ही खरेदी केली असेल. तरीही फायदा घेता येतो.
तर गृहकर्जावर कर नियम 24B अंतर्गत 2 लाख रुपयांच्या व्याजावर कर सवलतीचा लाभ घेता येतो. आता 7,75,000 रुपयांमधून 2,00,000 रुपये कमी केले तर तुमचे उत्पन्न 5,75,000 रुपये राहिल.
50,000 रुपयांपर्यंत तुम्ही NPS मधील गुंतवणुकीतून वाचवू शकता. राष्ट्रीय निवृत्ती योजनेत 50,000 रुपयांपर्यंतची गुंतवणूक सेक्शन 80CCD (1B) अंतर्गत कर सवलत मिळवून देते. 5,75,000 मधून 50,000 रुपये कमी झाल्यावर करपात्र उत्पन्न 5,25,000 रुपये राहिल.
तुम्ही एखाद्या चांगल्या कामासाठी रक्कम दान केली. अर्थसहाय्य केले आणि त्याची पावती तुमच्याकडे असेल तर सेक्शन 80G अंतर्गत तुम्हाला 25,000 रुपयांपर्यंत बचत करता येते. म्हणजे तुम्ही आता पाच लाख रुपयांच्या उत्पन्नावर येऊन ठेपता.
5,00,000 रुपयांच्या उत्पन्नावर 12,500 रुपयांचा कर लागतो. सेक्शन 87A अंतर्गत 12500 रुपयांचा रिबेट मिळतो. त्यामुळे सरतेशेवटी तुम्हाला करापोटी एक छदामही द्यावा लागत नाही.