Petrol Diesel Price : होळीपूर्वी भावात चढउतार, आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव काय

| Updated on: Mar 04, 2023 | 8:34 AM

Petrol Diesel Price : होळीचा जल्लोष आता लवकरच देशभरात सुरु होईल. होळी पर्यटन हा नव्यानेच सुरु झालेला प्रकार आहे. अनेक जण परंपरागत होळी खेळण्यासाठी देशाच्या कान्याकोपऱ्यात जातात. पण त्यापूर्वी पेट्रोल-डिझेलच्या किंमती जरुर तपासा. नाहीतर खिशाला मोठी झळ बसू शकते.

Petrol Diesel Price : होळीपूर्वी भावात चढउतार, आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव काय
आजचा भाव काय
Follow us on

नवी दिल्ली : भारतात प्रत्येक दिवशी सरकारी तेल विपणन कंपन्या पेट्रोल-डिझेलचे भाव (Petrol Diesel Price)जाहीर करतात. हे दर आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या किंमतीं (Crude Oil Prices) आधारे ठरतात. आज, 4 मार्च 2023 रोजी कच्चा तेलाच्या किंमतीत वृद्धी झाली आहे. त्यामुळे देशातील अनेक शहरातील इंधन दरावर त्याचा थेट परिणाम दिसून आला. पेट्रोलपेक्षा डिझेलच्या किंमतीवर त्याचा लागलीच परिणाम दिसून येतो. कच्चा तेलाच्या भावात वाढ झाली आहे. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईलमध्ये (WTI Crude Oil) आज 1.94 टक्के भाव वाढ झाली. त्यामुळे हे कच्चे तेल 79.68 डॉलर प्रति बॅरल विक्री झाले. ब्रेंट क्रूड ऑईलमध्ये (Brent Crude Oil) 1.27 टक्के वाढ झाल्याने एक बॅरलचा भाव 85.83 डॉलर झाला. गेल्यावर्षी 22 मे 2022 नंतर देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही.

भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.

  1. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 22 मे 2022 रोजी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती.
  2. देशात गेल्यावर्षी 21 मे रोजीनंतर इंधनाच्या किंमती मोठा बदल दिसून आला.
  3. हे सुद्धा वाचा
  4. पेट्रोलवर प्रति लिटर 8 रुपये तर डिझेलवर प्रति लिटर 6 रुपयांची कपात झाली.
  5. त्यानंतर काही राज्यांनी ही त्यांच्या मूल्यवर्धित करात (Value Added Tax-VAT) कपात केली होती.
  6. हिमाचल प्रदेश सरकारने यावर्षीच्या सुरुवातीला डिझेलवर 3 रुपये व्हॅट लावला.
  7. पंजाब सरकारने पेट्रोल-डिझेलवर प्रति लिटर 90 पैसे सेस लावला.
  8. केरळचे अर्थमंत्री के एन बालगोपाल यांनी पेट्रोल-डिझेलवर 2 रुपये प्रति लिटर सामाजिक सुरक्षा उपकर (Cess) लावला.
  9. पेट्रोल आणि डिझेल कमी किंमतीत विक्री केल्याने 21,200 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची तेल कंपन्यांची ओरड आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील इंधन दर

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 105.99 तर डिझेल 92.53 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.24 रुपये आणि डिझेल 92.79 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत 107.18 तर डिझेल 93.69 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 107.34 पेट्रोल आणि डिझेल 93.82 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 106.33 आणि डिझेल 92.85 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.05 आणि डिझेल 92.60 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.60 तर डिझेल 94.08 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 तर डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 108.33 तर डिझेल 94.79 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.53 रुपये आणि डिझेल 93.03 रुपये प्रति लिटर
  12. पुण्यात पेट्रोलचा भाव 105.96 आणि डिझेल 92.48 रुपये प्रति लिटर
  13. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.92 रुपये तर डिझेल 93.43 रुपये प्रति लिटर आहे